Saif Ali Khan In Adipurush Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Look: मनगटावर रुद्राक्ष, डोळ्यात राग.. आदिपुरुष मधल्या रावणाने फायनल ट्रेलर गाजवला, सैफ अलीच्या लूकची सर्वत्रच चर्चा

Ravan Look In Adipurush Film: ‘आदिपुरुष’ चित्रपटात सध्या सैफचा लूक, त्याचा अभिनय आणि एकंदर त्याचा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला आहे. लंकेशच्या भूमिकेतील त्याच्या भारदस्त आवाजानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

Chetan Bodke

Saif Ali Khan In Adipurush Trailer: सध्या सोशल मीडियासह बॉक्स ऑफिसवर आदिपुरूष चित्रपटाची तुफान चर्चा आहे. काल प्रदर्शित झालेला फायनल ट्रेलर पाहून काही चाहते आनंदित आहेत तर काही नाराज आहेत. व्हिएफएक्स मुळे सर्वाधिक ट्रोल झालेल्या रावणाच्या लूकची सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात सध्या सैफचा लूक, त्याचा अभिनय आणि एकंदर त्याचा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला आहे. लंकेशच्या भूमिकेतील त्याच्या भारदस्त आवाजानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

‘आदिपुरुष’ चा गेल्या वर्षी टीझर प्रदर्शित झाला होता, त्यामध्ये निर्मात्यांसह सैफ अली खानच्या लूकवरून दोघांनाही ट्रोल केले होते. त्यानंतर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून चित्रपटाच्या व्हिएफएक्समध्ये आणि सैफ अली खानच्या लूकमध्ये बदल करून आता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज केला आहे. सोबतच काही कलाकारांच्या देखील लूकमध्ये निर्मात्यांनी बदल केले होते. नुकताच काल प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्येही सैफच्या लूकमध्ये बदल केल्याचे दिसून येत आहे.

काल सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित होताच सैफ अली खानचा लूक, त्याचा अभिनय आणि त्याच्या स्टाईलची खूप एकच चर्चा होऊ लागली.त्याच्या भारदस्त आवाजाने सर्वांचेच लक्ष आता आपल्याकडे वेधले. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम भारत दौरा करत आहे, भारत दौरा करताना, प्रमोशनमध्ये मात्र सैफ अली खान कुठेच दिसून आला आहे. अनेकदा सोशल मीडियावर निर्मात्यांसह दिग्दर्शकांना देखील सैफ अलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पण चित्रपटाच्या अखेर फायनल ट्रेलरमध्ये सैफ अली खानचा लूक पाहिल्यानंतर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत कौतुक केले जात आहे.

‘पठान’पेक्षाही सर्वाधिक बजेट असलेल्या या चित्रपटात कलाकारांनी चांगलेच तगडे मानधन घेतल्याची चर्चा आहे. चित्रपटात प्रभासने प्रभू रामाची, क्रितीने सीतेची, सनी सिंगने श्रीरामाचे छोटे भाऊ लक्ष्मण यांची भूमिका साकरली आहे. तर सर्वाधिक चर्चेत असलेल्या सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली. प्रभासने १५० कोटी, सैफ अली खानने १२ कोटी, क्रिती सेननने ३ कोटी तर, सन्नी सिंगने १.५ कोटी इतकं मानधन स्विकारलं आहे. कलाकारांच्या या तगड्या मानधनामुळे आणि बिग बजेट चित्रपटामुळे चित्रपटाचं एकूण बजेट ७०० कोटींवर पोहोचलं आहे. अर्थात या सगळ्या आकड्यांविषयी निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT