प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. चित्रपटातील चंद्रा गाणं, चंद्राची चाहत्यांमध्ये चर्चा, दौलतरावांचा दरारा आजही आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतो. ‘चंद्रमुखी’नंतर अभिनेता आदिनाथ कोठारे कोणत्याही मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. पण त्याने बॉलिवूड काही टेलिव्हिजन शो आणि काही वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
अशातच सध्या त्याच्या रॅपर स्वॅगची चांगलीच चर्चा होत आहे. लवकरच एका हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदिनाथची ‘बजाव’ ही वेबसीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. ‘बजाव’ या वेबसिरीजमध्ये ‘ओजी’ या दिल्लीतल्या रॅपरची खलनायकी छाप त्याने प्रेक्षकांमध्ये सोडली आहे.. (Actors)
आदिनाथ कोठारेने आपल्या भूमिकेविषयी सांगितले की, “आजवर सोज्वळ धाटणीच्या भूमिका मी साकारल्या होत्या, पण या वेबसीरिजमधील माझी भूमिका एक चॅलेजिंग रोल होता. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला पहिल्यांदाच ‘बजाव’मुळे करता आली. मी पक्का मुंबईकर आहे. या भूमिकेसाठी दिल्लीच्या भाषेचा लहेजा आत्मसात करणे आणि रॅपरचा स्वॅग अंगात भिनवणे माझ्यासाठी खूप चॅलेजिंग होतं. खूप मजामस्ती आणि धमाल आणणारी ही वेबसीरीज आहे. नकारात्मक धाटणीच्या या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली, ही सिरीज माझ्यासाठी विशेष आहे कारण, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन वेगळं करायला मिळाल्याचं समाधान ‘बजाव’ने दिली अशी प्रतिक्रिया अभिनेता आदिनाथ कोठारेने दिली आहे.” (OTT)
आपल्या मुलाखतीत तो पुढे म्हणतो, “बॉडी लँग्वेजपासून ते अगदी बोलण्याच्या लहेजापर्यंतचा ‘रिदम फ्लो’ कसा असायला हवा? या सगळया गोष्टी मी स्वतः मध्ये बारकाईने भिनवत हा दिल्लीयेट ‘ओजी’ रॅपर साकारला आहे. मला माझ्या भूमिकेविषयी मनामध्ये शंका होती, पण जिओचे प्रोग्रामिंग हेड तेजकरण सिंग यांनी मला विश्वास दिला की, ही भूमिका मी करू शकतो. अशी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. शुटिंगच्या पहिल्या दिवशी रफ्तार सोबत ‘फेस ऑफ मुव्हमेंट’ होती. माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझी मेहनत या दोन्ही गोष्टींमुळे ही भूमिका चांगल्या प्रकारे करू शकलो.” (Web Series)
एका चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करतानाच, वेबसिरीजला मिळत असलेला प्रतिसाद आणि माझ्या भूमिकेचं होत असलेलं कौतुक नक्कीच प्रोत्साहन देणारं आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा अभिनेत्याने दिली. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.