मनोरंजन बातम्या

Adil Khan Durrani On Rakhi Sawant: मला ड्रग्ज दिले, मारहाण केली... आदिल खानचे राखी सावंतवर खळबळजनक आरोप

Adil Khan Accusations:

Pooja Dange

Adil Khan Accusations On Wife Rakhi Sawant:

फेब्रुवारी २०२३मध्ये राखी सावंतने तिचा पती आणि व्यावसायिक आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली होती.

आदिल खानच्या अटकेनंतर त्याच्यावर एका इराणी महिलेने लैंगिक छळाचा आरोपही केला होता. तेव्हापासून आदिल म्हैसूर तुरुंगात बंद होता. त्याची तुरुंगातून सुटका झाली असून तो मुंबईत स्पॉट झाला. त्याने प्रेस कॉन्फरन्स घेत त्याच्यावरील सर्व आरोपांवर मौन सोडले असून राखी सावंतवर गंभीर आरोप केले.

राखीने रितेशला घटस्फोट दिलेला नाही

प्रत्रकार परिषदेत आदिलने उघड केले की राखीने रितेश (राखीचा माजी पती) पासून घटस्फोट घेतलेला नाही. आदिलने सांगितले की, राखी आणि रितेशचा विवाह करारही दाखवला. तो म्हणाला, "राखीने तिच्या आईच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले की, तिचे रितेशशी लग्न झालेले नाही.

जेव्हा मी राखीशी लग्न केले आणि रजिस्ट्रारच्या कार्यालयात सही केली तेव्हा राखीने स्वत:ला अविवाहित असल्याचे घोषित केले. मी दुबईला गेलो होतो, तेव्हा ती यूकेला एका शोसाठी गेली होती, मी भारतात येण्याआधी ती भारतात परतली होती. एके दिवशी मी रितेशला पाठवलेली तिची व्हॉइस नोट पाहिली."

"त्या नोटमध्ये राखी म्हणाली होती, 'रितेश, आदिलशी लग्न करून मी चूक केली. तूच माझे आयुष्य आहेस. तुझ्यासोबत माझे दिवस खूप चांगले गेले. मी तुला विसरू शकत नाही.' त्यानंतर मी खूप शोधाशोध केली. रितेश दर महिन्याला तिला पैसे पाठवत होता. ती माझी फसवणूक करत होती. मला असेही कळले की राखीने रितेशशी लग्न केले आहे. त्यांचा घटस्फोट झालेला नाही."

आदिल खानने राखी सावंतवर आरोप केला आहे की, ती त्याला मारहाण करायची. बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर जेव्हाही अदिलने तिला रितेशबद्दल विचारले तेव्हा राखी त्याचा इश्यू करायची आणि मग अदिलशी भांडायची.

आदिलने राखीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते का?

राखी सावंतने एफआयआरमध्ये आदिलवर आरोप केला होता की त्याने अभिनेत्रीला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. यावर आदिल म्हणाला की, हे खोटे आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो, मी हे कधीच करू शकत नाही. अंगावरील जखमा दाखवत आदिल पुढे म्हणाला,

"एक दिवस राखीने मला खूप मारलं. मी राखीला म्हणालो की पुरे झाले. आपण गुपचूप लग्न केले. चल गुपचूप घटस्फोट घेऊ. माझा छळ करू नकोस. तिने माझ्याकडे नुकसानभरपाईची मागणी केली. त्यानंतर तिने माझ्याकडून दीड कोटी देखील मागितले. जे तिने जबरजस्तीने माझ्या व्यवसायात गुंतवले होते."

"जेव्हा मी तिला घटस्फोटाविषयी बोललो तेव्हा दुसऱ्या दिवशी तिने मीडियात पसरवले की आमचे लग्न झाले आहे. माझ्या घरच्यांनी सांगितले की मी त्यांची फसवणूक केली. राखीने माझे कपडे फेकले. ती म्हणाली की आता तुझी परिस्थिती न घर का ना घाट का अशी झाली आहे. मी तुला उद्ध्वस्त केले आहे."

आदिलच्या आधी राखीने रितेश नावाच्या एका बिझनेसमनसोबत लग्न केले होते, जो बिग बॉस 15 मध्ये देखील दिसला होता. शो सोडल्यानंतर राखी रितेशपासून वेगळी झाली होती. त्यानंतर राखीने मे 2022 मध्ये आदिलशी लग्न केले, ज्याची घोषणा तिने 2023 च्या सुरुवातीला केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: तेल्हारा नगरपालिकेत वंचित आणि शेतकरी पॅनलसह तेल्हारा विकासमंच'मध्ये युतीची घोषणा

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT