Panupuri Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Panipuri चित्रपटात सासू आणि जावयाची जुगलबंदी रंगणार; लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट ऐकायला प्रेक्षकही उत्सुक

Manasvi Choudhary

‘जावई’ म्हटल्यावर प्रत्येक मुलीचे आई-वडील त्याच्या मानपानाची काळजी घेतात. जावयाला काय हवं? काय नको? त्याला काही कमी पडायला नको यासाठी सासू-सासऱ्यांची कायम धडपड सुरू असते. अशीच एका घरातील सासू आणि जावई यांच्यातील धमाल जुगलबंदी आपल्याला पहायला मिळणार आहे. ‘पाणीपुरी’ या आगामी चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे जावयाच्या भूमिकेत तर त्याच्या खाष्ट सासूच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

एस. के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.

‘पाणीपुरी’ चित्रपटात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी चिवट सासू रंगवली आहे. तिचा आणि जावयाचा कलगीतुरा सतत सुरु असतो. सासू आणि जावई यांच्या जुगलबंदीत काय होतं? याची धमाल गोष्ट ‘पाणीपुरी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. धमाल कथानक, उत्तम स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट अभिनयाची मेजवानीच ठरेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : PM मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पूर्व केली, अजित पवार

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Esha Negi: 'हे सगळं करावच लागेल...' टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काऊचा धक्कादायक किस्सा

SCROLL FOR NEXT