बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर आता त्यांच्या मंतदारसंघाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे शिरूर मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. लोकसभेत बारामतीत झालेल्या पराभवानंतर अजित पवार विधानसभेला बारामतीतून लढतील का याबद्दल साशंकता होती. मात्र आता अजितदादा हे शिरूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार यांनी याआधी देखील ते बारामतीतून विधानसभा लढणार नसल्याचे संकेत दिले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर ते शिरूरमधून लढणार असल्याचं बोललं जात आहे. खरतर हा विधानसभा मतदारसंघ पारंपरिकपणे भाजपच्या तब्यात आहे. मात्र इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत शिरूर मतदारसंघातून कोणाची मुलाखत घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिरूरमधून अजित पवार लढतील असं बोललं जात आहे. दरम्यान, अजित पवार या गटातून लढणार असल्याच्या चर्चेने आता शिरूरमधल्या अजित पवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com