Urvashi Dholakia's Son On Her Bold Photo Instagram @urvashidholakia @kshitijdholakia
मनोरंजन बातम्या

दुनियादारी गेली उडत; Urvashi Dholakia चं बोल्ड बिकिनी फोटोशूट, मुलगा म्हणतो...

उर्वशीने तिचे बिकनीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, मुलगा क्षितिजने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Pooja Dange

Urvashi Dholakia's Son On Her Bold Photo: टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया तिच्या बोल्डनेसमुळे ओळखली जाते. तिचे टीव्ही मालिकेतील पात्र असो, सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओ असो. उर्वशी तिच्या रियल लाईफमध्ये सुद्धा तितकीच बोल्ड आहे. उर्वशीचे चाहते तिच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. काही दिवसांपूर्वी उर्वशीने तिचे बिकनीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तिचे स्ट्रेच मार्क आणि फॅट बेली दिसत होती. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. उर्वशीच्या मुलगा क्षितिजने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

क्षितिजने सांगितले की, 'त्याला आईच्या बोल्ड फोटोवर वाईट कमेंटमुळे खूप वाईट वाटायचे. परंतु तो आता या ट्रोलिंगला गांभीर्याने घेत नाही. लहानपणापासून आम्ही आईला कष्ट करताना पाहिले आहे. तिने कधीच कसलीच तक्रार केली नाही. आम्हाला जे हवे ते दिले तिने दिले आहे. लग्जरी लाईफ दिली आहे. तसेच तिने आम्हला तिच्यावर अवलंबून राहू दिले नाही. चांगल्या भविष्यासाठी मेहनत करायला शिकवले. आमच्या आईने तिचे आयुष्य तिला हवे तसे जगावे, त्यावर आमचा कधीच आक्षेप नाही. तसेच तिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करण्यावर सुद्धा आम्हला कोणतीच अडचण नाही.' (Social Media)

एका मुलाखतीदरम्यान ट्रोल करणाऱ्यांविषयी क्षितिज म्हणाला, ट्रोलच्या कमेंट वाचून मला आधी खूप त्रास व्हायचा. मला सोशल मीडियावर काही ग्रुप होते जे माझ्या आईला ट्रोल करायचे. मला अजूनही लक्षात आहे, जेव्हा मी हाय स्कूलमध्ये होतो तेव्हा मला सुद्धा ट्रोल करण्यात आले होते. मी सोशल मीडियावरील अनेक प्रोफाइलना रिपोर्ट केले होते. आता मी त्यांच्यावर हसतो. मी मूर्ख होतो. तेव्हा मला कळले नाही की ट्रोल कारण्याऱ्यांचे खऱ्या आयुष्यात अस्तित्व नसते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष कसे करायचे हे शिकलो आहे.

उर्वशी ढोलकिया प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. उर्वशी सिंगल मदर आहे. १७ वर्षाची असतानाच उर्वशी आई झाली होती. तिला दोन जुळे मुलगे आहेत. उर्वशी आता ४३ वर्षाची आहे. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात कुकरचा स्फोट झाल्यानं 14 जाण जखमी

Mumbai To Solapur: सोलापूरकरांसाठी खुशखबर! मुंबई-सोलापूर विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू

Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

एसटीचा प्रवास धोक्याचा! वाहकाची मुजोरी, भंडाऱ्यात महिला एसटी बस वाहकाची प्रवाशाला मारहाण|VIDEO

Ananya Pandey Filmfare Look: बांधणी साडीमध्ये अनन्याचा हॉट लूक, फोटो खुपच सुंदर

SCROLL FOR NEXT