Swanandi And Ashish Wedding Instagram
मनोरंजन बातम्या

Swanandi Tikekar Ukhana Video: ‘कुलकर्णींची सून…’ म्हणत स्वानंदी टिकेकरने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा, तुम्ही एकदा ऐकाच...

Swanandi Tikekar Married With Ashish Kulkarni: स्वानंदीने पती आशिषचं नाव 'कुलकर्णींची सून' म्हणत हटके उखाणा घेतला आहे. सध्या तिच्या ह्या उखाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Swanandi Tikekar Ukhana Video

प्रसाद- अमृता,सुरुची- पियुष, मुग्धा- प्रथमेश, गौतमी- स्वानंद पाठोपाठ काल (२५ डिसेंबर) टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी सोबत विवाहबंधनात अडकली.

लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये स्वानंदीने पती आशिषचं नाव 'कुलकर्णींची सून' म्हणत हटके उखाणा घेतला आहे. सध्या तिच्या ह्या उखाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Marathi Film)

स्वानंदीने तिच्या लग्नामध्ये घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. “मंगळसूत्राच्या दोन वाट्या, सासर-माहेरची खून, आशिषचं नाव घेते, कुलकर्णींची सून” असा स्वानंदीने लग्नासाठी खास उखाणा घेतला आहे. तिने घेतलेलं नाव ऐकून सासऱ्यांनी म्हणजेच आशिषच्या वडीलांनी तिचं कौतुक केलेलं आहे. सध्या सोशल मीडियावर स्वानंदीसोबत आशिषच्या लूकचे कौतुक होत आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी लग्नातले अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Marathi Actors)

फोटो शेअर करताना त्यांनी, 'आयुष्यभराची आनंदी साथ...' असं सुंदर कॅप्शन देत फोटो शेअर केले. तर, आशिषने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंना 'मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी' असे कॅप्शन दिले. त्याने हॅशटॅगमध्ये 'आनंदी' असे लिहिले आहे.

आशिष आणि स्वानंदीच्या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना भावी आयु्ष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. स्वानंदी आणि आशिष लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. स्वानंदीने लग्नामध्ये येलो कलरची साडी नेसली होती. तर आशिषने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. (Social Media)

स्वानंदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. सोबतच गेल्या काही दिवसांपूर्वी स्वानंदीने ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?’ या मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. स्वानंदी सिनेअभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे. स्वानंदी आणि आशिष यांची जोडी जुळण्यामागचे कारण म्हणजे संगीत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT