Sonalee Kulkarni And Sai Tamhankar News Instagram
मनोरंजन बातम्या

Sonalee Kulkarni Photos: ‘तुझ्या नव्या घरी कधी बोलवतेय?’, सईच्या कमेंटवर सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त सवाल; म्हणाली...

Sonalee Kulkarni And Sai Tamhankar News: नुकतीच सई ताम्हणकरने सोनाली कुलकर्णीच्या फोटोवर हटके कमेंट केली आहे.

Chetan Bodke

Sonalee Kulkarni And Sai Tamhankar News

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते. तिच्या फॅशनची भुरळ फक्त चाहत्यांनाच नाही तर, अनेक सेलिब्रिटींवरही पडली आहे. नुकतंच सोनालीने सोशल मीडियावर सोनालीने काही फोटोज शेअर केले आहेत. तिच्या नव्या फोटोंवर अभिनेत्री आणि सोनालीची बेस्ट फ्रेंड म्हणून चर्चेत राहणारी सई ताम्हणकरने एक कमेंट केली आहे. त्या कमेंटमुळे दोघीही सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोनाली कुलकर्णी हिने नुकतंच दुबईमध्ये एक नवं आलिशान घर खरेदी केलं आहे. पती कुणाल बेनोडेकरसोबत सोनाली आपल्या दुबईच्या नव्या घरात पाडवा साजरा केला. दिवाळीमध्ये सोनालीने पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. त्याच पोस्टवर अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘क्यूट’ म्हणत एक कमेंट केली आहे. यावर सोनालीने ‘ओके, पण तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेय ते सांग आधी’ सईला अशी कमेंट केली आहे. (Social Media)

Sonalee Kulkarni Post

या कमेंटवर सईने ‘तुमचं दुबई, लंडन झालं की सांगा मॅडम’ सोनालीला अशी कमेंट केली आहे. पुढे सोनालीने ‘राहू दे, राहू दे’ अशी कमेंट केली आहे. यावर सईने ‘हा काय आता’ अशी कमेंट केली. या दोन्ही बेस्ट फ्रेंडच्या कमेंटची चांगलीच चर्चा होते. या दोघींचीही मैत्री फार जुनी असून कायमच सोशल मीडियावर एकमेकींसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहतात. (Actress)

सोनालीने दुबईमध्ये नवं घर खरेदी केलं आहे. फोटोच्या माध्यमातून सोनालीने तिच्या नव्या आलिशान घराची झलक दाखवली आहे. सोनालीने आपल्या दुबईतील नव्या घरामध्ये खास फोटोशूट केले आहे. चॉकलेटी रंगाची ट्रेडिशनल साडी, केसात गजरा, गळ्यात ट्रेडिशनल ज्वेलरी परिधान करुन अभिनेत्रीने फोटोशूट केलंय. सोनालीने आपल्या नव्या घरातील फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. सोनालीने हे फोटो शेअर करताना 'पाडवा नवीन घरात' असं कॅप्शन देत फोटो शेअर केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT