Sonam Khan Opens Up About Govinda’s Support Saam
मनोरंजन बातम्या

'त्यांनी माझा हात पकडून मला..', गोविंदाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाली?

Sonam Khan Opens Up About Govinda’s Support: अभिनेत्री सोनम खानने गोविंदाच्या पाठिंब्याबद्दल भावनिक खुलासा केला आहे. तिनं पोस्ट शेअर करून हा खुलासा केला आहे.

Bhagyashree Kamble

  • अभिनेत्री सोनम खानकडून गोविंदाच्या पाठिंब्याबद्दल भावनिक खुलासा.

  • डान्सची भीती दूर करण्यासाठी केली मदत.

  • पोस्ट शेअर करून भावनिक संदेश लिहिला.

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम खानने अलिकडेच तिच्या सुरूवातीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेता गोविंदामुळे तिला पाठिंबा मिळाला असून, स्टेज परफॉर्मन्स आणि डान्सची भीती तिनं कशी घालवली? याबद्दल तिनं माहिती दिली. तिनं अभिनेता गोविंदासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही तिनं काम केलं आहे.

अलिकडेच तिनं गोविंदासोबतचा तिचा अनुभव शेअर केला आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर गोविंदासोबतचा एका जुना फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत तिनं भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. 'गोविंदाजी मला नेहमी म्हणायचे.. तू अगदी माझ्यासारखी आहे. आम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मला अजूनही आठवते आहे, त्यांनी माझा हात धरला होता. मला नृत्य कसे करावे, हे त्यांनी शिकवलं होतं', असं ती म्हणाली.

सोनमने खुलासा केले की, जेव्हा तिनं इंडस्ट्रीमध्ये सुरूवात केली होती. तेव्हा तिनं ३० हून अधिक चित्रपट साइन केले होते. पण त्यावेळेस तिच्याकडे नृत्य कौशल्य नव्हते, असं तिनं सांगितलं. 'माझ्याकडे नृत्य कौशल्य नव्हते. शूटिंग वेळापत्रकामुळे रिहर्सल करण्यासाठीही वेळ नव्हता.'

'गोविंदाजी यांनी मला डान्स स्टेप्स शिकवले. डान्स करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गोविंदा सर जितके नम्र आणि मदतगार आहेत. तितकेच ते एक मोठे स्टार आहेत. माझ्या कारकिर्दीत मला त्यांच्यापेक्षा नम्र आणि प्रामाणिक को- अॅक्टर भेटला नाही', असंही सोनम म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच द्या लक्ष, नाहीतर...

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये राडा; धक्काबुक्की करत खलिस्तानीची घोषणाबाजी

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

Genelia Deshmukh: एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं, पाहा जेनिलियाचे खास फोटो

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवले; मुलाला फाशी द्या! संतापलेल्या बापाची मागणी|VIDEO

SCROLL FOR NEXT