MyLek Official Teaser Out Instagram
मनोरंजन बातम्या

MyLek Teaser: रियल लाईफ मायलेकी एकत्र करणार स्क्रिन शेअर, सोनाली- सनायाच्या 'मायलेक'चा टीझर रिलीज

MyLek Official Teaser: आई आणि मुलीचे नाते खास असते. या नात्यात अनेकदा घनिष्ट मैत्री आणि रुसवे फुगवे पाहायला मिळतात. याच गोड मैत्रीतल्या नात्याची गोष्ट उलगडणारा 'मायलेक'चा टीझर रिलीज झाला.

Chetan Bodke

MyLek Official Teaser Out

आई आणि मुलीचे नाते हे सर्वात जवळचे आणि विशेष म्हणजे खास असते. या नात्यामध्ये आपल्याला अनेकदा घनिष्ट मैत्रिणीचं नातं पाहायला मिळते. तर अनेकदा ह्या मैत्रीत रुसवे फुगवेही पाहायला मिळतो. याच गोड मैत्रीतल्या नात्याची गोष्ट उलगडणारा 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि लेकीच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या ह्या टीझरची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. (Marathi Film)

नुकतीच या चित्रपटाच्या टिझरची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या टीझरमध्ये, सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्यातील सुदृढ नाते या टीझरमध्ये दिसत आहे. यात आईला जितके मुलीचे कौतुक आहे, तितकेच कौतुक आणि विश्वास मुलीलाही तिच्या आईबद्दल आहे. या चित्रपटात उमेश कामतही प्रमुख भूमिकेत आहे. सोनाली एका शेफच्या भूमिकेत दिसते. एका आई आणि मुलीचे नाते कसे असावे ?, या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. (Marathi Actress)

आई आणि लेकीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिलपासून थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माय-लेकीच्या प्रमुख भूमिकेत सोनाली खरे आणि सनाया आनंद आहे. सोनाली आमि सनाया या दोघी रियल लाईफमध्ये मायलेकी आहेत. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर या दिग्दर्शिका आहेत. सोनाली खरेने या चित्रपटाची निर्माती असून कल्पिता खरे आणि बिजय आनंद चित्रपटाची सहनिर्माते आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Social Media)

मायलेक चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रिअलमधील माय-लेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येक मुलगी आणि आईला जवळचा वाटेल, असा हा चित्रपट असून सर्वांनाच चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT