Smita Patil Manthan Film Screening At Cannes Festival 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manthan Film Special Screening : कान्समध्ये ४८ वर्षे जुन्या 'मंथन'चे प्रेक्षकांकडून कौतुक; बॉक्स ऑफिसवर चित्रपट पुन:प्रदर्शित होणार

Chetan Bodke

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ७७व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2024) भारतीय चित्रपट आणि कलाकार-दिग्दर्शकांचे खूप कौतुक होत आहे. यावेळी फिल्म फेस्टिव्हलमध्ये, अनेक भारतीय चित्रपटांचा समावेश झालेला होता. यामध्ये, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते श्याम बेनेगल यांच्या 'मंथन' या गाजलेल्या चित्रपटाचाही समावेश आहे. जागतिक पातळीवर कौतुकाची थाप मिळाल्यावर 'मंथन' चित्रपट पुन्हा एकदा भारतातील काही थिएटर्समध्ये पुन:प्रदर्शित होणार आहे.

१९७६ मध्ये रिलीज झालेल्या 'मंथन' चित्रपटाचा प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये करण्यात आला होता. प्रदर्शनानंतर या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झाले. त्यासोबतच या चित्रपटासाठी उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशनही दिले. त्यानंतर 'मंथन'च्या पुन:प्रदर्शनाची योजना आखली आहे. फिल्म हेरिटेज फाऊंडेशन आणि गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पीव्हीआर-आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये 'मंथन' प्रदर्शित होणार आहे. ५० शहरांमधील १०० सिनेमागृहांमध्ये १ आणि २ जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह यांच्यासह डॉ. गिरीश कर्नाड, अमरिश पुरी, डॉ. मोहन आगाशे, कुलभूषण खरबंदा, अनंत नाग, अभा धुलिया आदी कलाकार आहेत. ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या चित्रपटाचे छायालेखन केले असून, संगीत दिग्दर्शन वनराज भाटियांनी केले आहे. पाच लाख शेतकऱ्यांच्या निधीतून बनलेला 'मंथन' हा लोकांनी लोकांसाठी बनवलेला चित्रपट आहे. गुजरातची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने दोन रुपये जमा केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Navaratri 2024 : मुंबईत 'या' देवीच्या मंदिरातील भिंत आहे खूप खास, सर्व इच्छा होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT