Shivali Parab Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab Trolled : "पैसे आले की..."; शिवाली परब नव्या फॅशनवरून ट्रोल, नेटकऱ्यांनी केली कानउघडणी

Shivali Parab New Photos : हास्यजत्रा फेम शिवाली परबने आपल्या फॅशनच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या अभिनेत्री इन्स्टाग्रामवरील एका नवीन फोटोशूटमुळे ट्रोल होत आहे.

Chetan Bodke

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शिवाली परबने आपल्या कॉमेडीने चाहत्यांचे मने जिंकले आहेत. अभिनयासोबतच शिवालीच्या फॅशनचीही चाहत्यांमध्ये चर्चा असते. काही वेळापूर्वीच शिवालीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटोज् शेअर केले आहेत. या नव्या फोटोंमुळे सध्या ती ट्रोल होत आहे.

कायमच शिवाली इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करते. नुकतंच शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये शिवालीने ब्लॅक कॉर्सेट टॉप आणि ग्रीन ट्राऊजर वेअर करत नवीन फोटोशूट केले आहे. ओपन हेयर्स, ग्लॉसी मेकअप आणि न्यूड लिपस्टिक असा लूक तिने केलेला आहे. "डोन्ट स्वाईप..." असं कॅप्शन देत शिवालीने हे फोटोशूट शेअर केलेले आहे. या नव्या फोटोशूटमुळे शिवाली प्रचंड ट्रोल होत आहे.

१६ हजारांहून अधिक युजर्सने शिवालीच्या फोटोंना लाईक केले असून अनेक युजर्सने कमेंट केलेल्या आहेत. शिवालीला नेटकऱ्यांनी "पैसे आले की अस करणे गरजेचं आहे का", "नको ग असा कपडा घालू कसा वाटता ते उगडा उगडा", "भविष्यातील मराठी इंडस्ट्री मधील टॉप ची एक्टरेस", "अति सुंदर आणि कडक शिवा" अशा कमेंट्स अनेक युजर्सने तिच्या फोटोंवर केलेल्या आहेत. त्यासोबतच "ब्युटिफुल", "मादक", " लूकिंग सुपर गॉर्जियस शिवा" अशा कमेंट्स करत अनेकांनी तिच्या लूकचे कौतुकही केले आहे.

शिवाली परबबद्दल सांगायचे तर, शिवालीने गेल्या काही दिवसांपूर्वी स्वकमाईवर घर घेतले आहे. तिच्या वाढदिवशी तिने त्या घरात प्रवेश केला आहे. शिवालीला सर्वाधिक प्रसिद्धी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून मिळालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT