Sara Ali Khan Instagram @saraalikhan95
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan Trolled : सारा अली खानवर नेटकरी संतापले, गणपती पुजेमुळं झाली ट्रोल

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खाननेही लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बुधवारी राज्यभरात लाडक्या गणरायाचे आगमन अगदी थाटामाटात करण्यात आले. अनेक मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील (Marathi and Bollywood Actors) कलाकारांनीही आपल्या घरी बाप्पांचे आगमन जोरदार केले. सलमान खानची बहिण अर्पिता खान, शाहरुख खानपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक कलाकारमंडळींच्या घरी गणरायाचे स्वागत मोठ्या जालोशात करण्यात आले. दरम्यान, सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खाननेही (Sara Ali Khan) लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. साराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोत सारा आणि साराची आई अमृता सिंग गणपती बाप्पाच्या पाया पडताना दिसत आहेत. परंतू ट्रोलर्सने तिच्या या पोस्टरमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

साराने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये साराने, 'गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.' असे कॅप्शन लिहिले आहे. आता काही ट्रोलर्सनी या फोटोवरुन साराला टार्गेट केले आहे.

ट्रोलर्सने असभ्य भाषा वापरत सारावर चांगलाच निशाणा साधला आहे. 'तूला लाज वाटली पाहिजे की मुस्लिम असूनही देवपूजा करते.' असे एका नेटकऱ्यांने कमेंटमध्ये लिहिले. एका युजरने अशीही कमेंट केली आहे की, 'सारा तू पैशासाठी तुझा धर्मही विकला.' अशाप्रकारच्या गंभीर कमेंट्स साराच्या पोस्टवर ट्रोलर्सने केल्या आहेत. परंतु, जेवढी तिच्यावर टिका केली जात आहे, तेवढाच तिला पाठिंबाही मिळतोय. 'समाजात तुझ्यामुळे चांगला संदेश मिळतोय.'असे एका युजरने तिला पाठींबा देत लिहिले, 'ट्रोलर्सकडे लक्ष देऊ नको, ते बोलतच राहतील.' असा सल्ला एका तिला एका चाहत्याने दिला आहे. एवढेच नाही तर साराच्या पोस्टवर तिचे चाहते आणि ट्रोलर्स एकमेकांशी भांडतानाही दिसत आहेत.

अनेकदा सारा धार्मिक कारणांनी ट्रोल झाली आहे. केदारनाथ मधील फोटो असो किंवा काही तीर्थक्षेत्रांना दिलेली भेट असेल, यामुळे अनेकदा सारा टिकेची धनी झाली आहे. साराने अनेकवेळा सांगितले आहे की, ती कोणत्याही धर्म किंवा जातीवर विश्वास ठेवत नाही. एकदा सारा म्हणाली होती की, 'तिला जिथे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, त्या ठिकाणी ती नतमस्तक होते. मग ते गुरुद्वारा असो किंवा मंदिर!'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT