Sai Tamhankar And Mother Relation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Sai Tamhankar : आईसोबत का राहत नाही सई ताम्हणकर?; स्वत: खुलासा करत सांगितलं कारण

Sai Tamhankar Struggle Story : सई तिच्या आईसोबत राहत नाही. त्या दोघी वर्षातून केवळ सहा महिने किंवा त्यापेक्षाही कमी वेळ एकत्र राहतात. त्यामागचं कारण अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलंय.

Chetan Bodke

दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत : चे स्थान निर्माण केलं आहे. सई बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आज सई ताम्हणकरचा वाढदिवस आहे. सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीमध्ये झाला. सईसाठी २०२४ हे वर्ष खूप खास ठरलं. यावर्षात ती अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सई आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र सई तिच्या आईसोबत राहत नाही. त्या दोघी वर्षातून केवळ सहा महिने किंवा त्यापेक्षाही कमी वेळ एकत्र राहतात. त्यामागचं कारण अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलंय.

सई मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. एक यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास तिचा काही सोपा नाही. मुळची सातारची असलेल्यान सईने मुंबईमध्ये आतापर्यंत १० घरांत भाड्याने राहिली. अभिनेत्रीने गेल्या वर्षी मुंबईमध्ये ११ वं पण स्वत:चं नवीन घर खरेदी केलं. बालपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे तिने १९ व्या वर्षी मुंबई गाठली होती. सई आईसोबत मुंबईत राहत नाही. ती वर्षातून तिच्या आईसोबत सहा महिने किंवा त्यापेक्षाही कमी दिवस राहते. याबद्दलचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.

ती मुलाखतीमध्ये म्हणाली, "माझं आणि आईचं एकमेकींवर खूप प्रेम आहे, पण तरीही आम्ही दोघीही एकत्र राहत नाही. मी आमच्या नात्याला तलवारीची उपमा देते. कारण त्या एका म्यानात दोन तलवार नाही राहू शकत नाही. आम्ही वर्षातले सहा महिने एकत्र राहतो, तर सहा महिने वेगवेगळे राहतो. शुटिंग वैगेर अनेक कारणांमुळे आम्हाला एकत्र राहणं जमत नाही. आजवर आम्ही दोघींनीही आयुष्यामध्ये ज्या काही लढाया लढलो आहेत, त्या खूप मोठ्या आहेत. मोठं युद्ध जिंकून आजवर इथपर्यंत पोहचलो आहोत."

सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष खूपच खास आहे. कारण यावर्षात ती अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली तर आहेच पण तिने स्वत:साठी नवीन अलिशान कारही खरेदी केली. 'श्रीदेवी प्रसन्न', 'भक्षक', 'अग्नी', 'ग्राउंड झिरो', 'डब्बा कार्टेल' आणि 'मटका किंग' या प्रोजेक्ट्समधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील काही प्रोजेक्ट्स रिलीज झाले आहेत. तर काही रिलीज झालेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

SCROLL FOR NEXT