Sai Tamhankar lavni aalech me Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar: 'आलेच मी...' ; सई ताम्हणकरची ठसकेदार लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

Sai Tamhankar lavni: विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई ताम्हणकर 'आलेच मी' या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. देवमाणूस चित्रपटातील सईची आलेच मी ही पहिली लावणी प्रदर्शित झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Sai Tamhankar lavni: मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार आहे, कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर 'देवमाणूस' या बहुप्रतिक्षित चित्रपटात 'आलेच मी' म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लव फिल्म्सच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विविधांगी भूमिका साकारून आपली छाप पाडणारी सई, 'आलेच मी' या गाण्यातून एका वेगळ्याच अविष्कारात प्रेक्षकांसमोर येत आहे. पारंपरिक मराठी संगीतसृष्टीत आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडे यांच्या दमदार आवाजात हे गीत साकारण्यात आले असून रोहन प्रधान यांनी त्यांना साथ दिली आहे. रोहन-रोहन यांचे संगीत लाभलेले हे गाणे तेजस देऊस्कर यांनी लिहिले असून रोहन गोखले यांनीही अतिरिक्त गीतलेखन केले आहे. सुप्रसिद्ध लावणी नर्तक आशीष पाटील याने या गाण्याची नृत्यरचना केली आहे.

या भूमिकेसाठी सईने तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक वेळ सरावाला केला, लावणीच्या प्रत्येक नजाकतीत ती पूर्णपणे रमली आणि एक धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला आहे. आपल्या अनुभवाबद्दल सई म्हणते, “'देवमाणूस'मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडले, याबद्दल मी खूप आभारी आहे. आशीषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. प्रेक्षकांना माझे हे नवे रूप आवडेल, अशी आशा आहे!”

'आलेच मी' हे गाणे त्याच्या भन्नाट बीट्स, आकर्षक सादरीकरण आणि सईच्या जबरदस्त उपस्थितीमुळे लवकरच टॉप लिस्टमध्ये झळकण्यास सज्ज आहे. लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT