Sai Pallavi
Sai Pallavi Saam Tv
मनोरंजन बातम्या

काश्मिरी पंडितांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण म्हणाली...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Actress Sai Pallavi: दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) साई पल्लवी (Sai Pallavi) गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान साई पल्लवीने ‘द काश्मीर फाइल्स’ (Kashmir Files) या चित्रपटाचा संदर्भ देत एक खळबळजनक व्यक्तव्य केलं होत. साई पल्लवीने 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे त्यानंतर ती वादात सापडली. मात्र, या वक्तव्यावर आता साई पल्लवीने एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

साईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबाद स्पष्टीकरण दिल आहे. साई त्या व्हिडीओमध्ये म्हणाली, असे पहिल्यांदा होत आहे की, मी कोणत्यातरी गोष्टीचे स्पष्टीकरण देत आहे. मी माझी बाजू मांडताना किंवा कोणत्याही विषयावर बोलताना दोनदा विचार करते, ही गोष्ट पहिल्यांदाच घडली असेल. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मी माझं मतं मांडायला उशिर केला असेल तर, मला माफ करा.

पुढे ती म्हणाली की, एका मुलाखतीमध्ये मी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर अनेकांकडून ट्रोल केलं जात आहे. मी फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करत होतो की धर्माच्या नावावर कोणताही वाद हा चुकीचा आहे. मी एक तटस्थ व्यक्ती आहे. मी जे काही बोललो ते चुकीच्या पद्धतीने मांडले गेले याचा मला धक्का बसला आहे. या व्हिडीओला साईने, 'हे माझं स्पष्टीकरण ' असे कॅप्शन देखील दिले आहे.

काय म्हणाली होती साई पल्लवी?

मुलाखतीत बोलताना साई पल्लवी म्हणली की, ‘मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंग बद्दल खूप ऐकले आहे, पण कोण बरोबर आणि कोण चूक, हे मी सांगू शकत नाही. काश्मिरी पंडितांची हत्या कशी होते, हे 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण, त्याचवेळी काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याला जय श्री रामचा नारा लावण्यास सांगितले गेले, ही सुद्धा धर्माच्या नावावर होणारी हिंसा आहे. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?

'विराट पर्वम' या चित्रपटात साई पल्लवीने एका नक्षलवाद्याच्या प्रेमात पडलेल्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना साईने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या चित्रपटात साईसोबत राणा दग्गुबती, प्रियामणी आणि नंदिता दास देखील दिसणार आहेत. ही प्रेम आणि राजकारणाची संमिश्र कथा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Loksabha: मोहिते पाटलांनी स्वतःसाठी खड्डा खणला; लुंग्यासुंग्यांचे आव्हान मानत नाही... रणजितसिंह निंबाळकरांचे टीकास्त्र

Mumabi's Famous Food: 'हे' आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT