Rinku Rajguru Film Jhimma 2 Team Join Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Poster: ‘आईच्या नाही… आज्जीच्याही गावात!’; 'झिम्मा २'मध्ये आर्चीची एन्ट्री, सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

Jhimma 2 Marathi Film Update: हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २'मध्ये दोन नव्या सदस्यांची एन्ट्री झाली आहे.

Chetan Bodke

Jhimma 2 Poster

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ला मिळालेल्या अभूतपुर्व यशानंतर निर्मात्यांनी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमाचा नवा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या नव्या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना एक नाही दोन नवीन सदस्य दिसून येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा २’चं सध्या सर्वत्र जोरदार प्रमोशन सुरू आहे. सुपरहिट ‘झिम्मा’ नंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘झिम्मा २’ येणार आहे. ‘झिम्मा २’मध्ये महिलांच्या ग्रुपमध्ये दोन नव्या सदस्यांची एन्ट्री झाली आहे. नक्कीच त्या दोघींच्या एन्ट्रीने त्यांच्या ग्रुपमधला आनंद आणखीनच द्विगुणीत होईल, यात काही शंका नाही. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत यांच्या बरोबरीने रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघीही सामील झाल्या आहेत.

‘झिम्मा २’बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेंनी सांगितले की, “ ‘झिम्मा’ला लोकप्रियता मिळाली म्हणून त्याचा सिक्वेल करूया असा कधीच विचार केला नव्हता. पहिल्या भागाची कथा पुढे नेताना रियूनियनची मजा सापडली आणि हा चित्रपट करायचं ठरलं! प्रेक्षकांनी कथेवर, त्यातल्या पात्रांवर भरभरून प्रेम केलं त्यामुळे या पात्रांना पुन्हा तितक्याच सहजतेने सादर करण्याची जबाबदारी होती. पण सर्व कलाकारांनी ‘झिम्मा २’ ची मजा घेत, आपलेपणाने चित्रपट बनवला. मला खात्री आहे, आमचा हा आपलेपणा आणि साधेपणा प्रेक्षकांनाही आपलंसं करेल.”

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित चित्रपटाचे निर्माते ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग असून चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे आहेत. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : जोडीदारासोबत वाद टाळा; 5 राशींची पैशांची चणचण मिटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

SCROLL FOR NEXT