अभिनेत्री राधिका सरथकुमार यांच्या आई गीता राधा यांचं निधन
गीता या दिवंगत तमिळ अभिनेते एम.आर. राधा यांच्या पत्नी होत्या
काही दिवसांपासून आजारी असलेल्या गीतांचं रविवारी रात्री निधन
त्यांच्या पार्थिवावर चेन्नईच्या बेसेंटनगरमध्ये अंत्यसंस्कार होणार
Radhika Sarathkumar Mother Passed Away: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग आणि संगीतकार चरणजीत आहूजा यांच्या निधनाने चाहते दु:खात आहेत. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री राधिका सरथकुमारच्या आईचं निधन झाल्याची घटना घडली आहे. राधिकाची आई गीता राधा यांनी रविवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गीता या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अभिनेत्री राधिकाने व्हिडिओ शेअर करत आईच्या आठवणींना उजाळा दिला.
गीता राधा या दिवंगत अभिनेते एमआर राधा यांच्या पत्नी होत्या. दिवंगत एमआर हे तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. गीता यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी रात्री गीता राधा यांचा निधन झालं. अभिनेत्री राधिका हिने स्वत: आईच्या अंत्यविधीची माहिती दिली.
राधिका सरथकुमार हिने सांगितलं की, 'आईचं पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी पोएस गार्डन येथे आणलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर चेन्नई येथील बेसेंटनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील'. गीता राधा यांच्या अंत्यविधीला कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी येण्याची शक्यता आहे.
गीता राधा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. गीता यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिनेसृष्टीतील अनेकांनी गीता राधा यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
अभिनेत्री राधिका सरथकुमारने १९८१ साली 'नसीब अपना अपना' या सिनेमात काम केलं. या सिनेमात राधिकाने चंदो या पात्राची भूमिका साकारली होती. राधिकाने या सिनेमात केलेल्या अभिनयाचं आजही कौतुक होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.