राधिका आपटे ही कायमच चर्चेत असते. राधिका आपटेची सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये, तिने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबद्दल महत्वपूर्ण विधान केले आहे. तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पितृसत्ताक संस्कृती आहे. तिथे महिलांना खूप चुकीची वागणूक देतात, असं राधिका आपटेने विधान केले. या मुलाखतीत तिने तेलुगू इंडस्ट्रीमध्ये मिळालेल्या वागणुकीवर भाष्य केले आहे. (Bollywood)
राधिका आपटेने मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये तिने काम केले आहे. दरम्यान, राजीव मसंदला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री राधिका आपटे म्हणाली होती की, "मला तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर स्ट्रगल करावा लागला आहे. कारण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, अजूनही पितृसत्ताक किंवा पुरुष प्रधान संस्कृती पाहायला मिळत आहे. पुरुष अंध राष्ट्रभक्त असतात. त्या इंडस्ट्रीमध्ये महिलांना ज्या पद्धतीने वागवले जाते ते असह्य आहे." (Bollywood Actress)
तेलुगू इंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल सांगताना पुढे राधिका म्हणाली, "चित्रपटांमधील माझी व्यक्तिरेखाही खूप साधी होती. चित्रपटाच्या सेटवरही वेगळ्या पद्धतीने वागणूक दिली जाते. सेटवर महिला कलाकारांना एका परक्या व्यक्तीसारखी वागणूक दिली जाते. मी तेलुगू इंडस्ट्रीमध्ये खूप संघर्ष केला आहे. आता मी ते सोडून दिले आहे. हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय असं मला वाटतं." अभिनेत्रीच्या ह्या मुलाखतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून या मुलाखतीमुळे सध्या तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्रीची ही मुलाखत जुनी असून सध्या सोशल मीडियावर ही मुलाखत तुफान व्हायरल होत आहे. (Radhika Aapte)
मराठमोळी राधिका आपटे कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे प्रचंड चर्चेत असते. ती कायमच सोशल मीडियावर आपल्या खास अंदाजातील फोटो शेअर करत असते. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.