Prarthana Behere Luxurious House  Saam TV
मनोरंजन बातम्या

Prarthana Behere House Video: प्रार्थना बेहेरेच्या नवीन घराची झलक पाहिली का?, मुंबईपासून काही अंतरावर बांधला आलिशान बंगला

Prarthana Behere House: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मुंबईतून शिफ्ट झाली आहे.

Pooja Dange

Prarthana Behere Buys Luxurious House:

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मुंबईतून शिफ्ट झाली आहे. अभिनेत्रीने तिच्या युट्युब चॅनेलवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. ती मुंबई सोडून कुठे गेली असेल? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल.

सध्या बऱ्याच अभिनेत्री त्यांच्या स्वतःच्या आणि हक्काच्या घर घेताना दिसत आहेत. कोणी काहीतरी नवीन करावं म्हणून घर घेतलं आहे. तर कोणी विश्रांती मिळावी म्हणून घर घेतलं आहे. यासगळ्यात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे थेट मुंबई सोडून अलिबाग गाठले आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने अलिबाग येथे नवीन घर घेतले आहे. तिचा नवरा आणि ती अलिबाग येथील त्यांच्या या घरामध्ये शिफ्ट झाले आहेत. युट्युबवर व्हिडीओमध्ये प्रार्थनाने ही माहिती शेअर केली आहे. प्रार्थनाने या व्हिडीओत सांगितले की, 'सुरुवातीला मला वाटलं होत की सगळं काम मुंबईत आहे. अलिबागवरून ते कसं मॅनेज होईल.'

प्रार्थना बेहेरे पुढे म्हणाली की, 'आता मुंबई-अलिबाग प्रवास इतका कठीण वाटत नाही. माझ्या घराजवळ जेट्टी आहे. तिथून मुंबईसाठी रोरो आणि बोट सेवा सुरू आहेत. त्यामुळे ४५ मिनिटं किंवा १ तासात मुंबईला पोहोचता येत. एवढा वेळ तर मुंबईत ट्रॅफिकमध्ये जातोच.' (Latest Entertainment News)

प्रार्थना बेहेरेने या व्हिडीओमध्ये असेही सांगितले की, हे घर तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. तिने आणि तिचा नवरा अभिषेकने हे घर खूप प्रेमाने बनवले असल्याचे प्रार्थना म्हणाली. प्रार्थनाचे हे घर खूप सुंदर आहे. तिच्या घरातमध्ये त्यांचे पेंट्स देखील आहेत. प्रार्थनाच्या घराचा संपूर्ण व्हिडीओ लवकरच तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

प्रार्थना बेहेरे तिच्या घराच्या टूरचा व्हिडीओ आपल्या भेटीला आणणारा आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि ऋतुजा बागवे देखाल त्यांच्या नवीन घरामुळे चर्चेत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज आपण श्वास घेतोय - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

SCROLL FOR NEXT