Phullwanti Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Phullwanti Song: देखणी रंभा, शुक्राची चांदणी..! प्राजक्ता माळी झाली फुलवंती, पाहा Video

Phullwanti Song Released: 'फुलवंती' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीची दिलखेचक अदा या गाण्यांमधून पाहायला मिळते आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनीत 'फुलवंती' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. येत्या काही दिवसांत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीची दिलखेचक अदा या गाण्यांमधून पाहायला मिळते आहे.

सोशल मीडियावर अत्यंत सुरेख अंदाजात प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर करत, नृत्य जीचा आत्मा आहे, संगीत जीचा श्वास आहे; अशा या फुलवंतीचं हे गाणं “आदि नृत्यदेवता- नटराजाचरणी” समर्पित असं कॅप्शन दिलं आहे.

फुलवंती चित्रपटातील गाण्यामध्ये प्राजक्ताने तिच्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने भुरळ घातली आहे. प्राजक्ताचे सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे. फुलवंती चित्रपटातील गाण्याचे लेखन विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे यांनी केले आहे. आर्या आंबेकर हिने गायले असून उमेश जाधव आणि प्राजक्ता माळीने नृत्य केले आहे. फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबरचा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Proposal Love Letter: मनी-स्वप्नी तुच तू, प्रिये 'I Love You'

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Skin Care : या ५ लोकांना चेहऱ्यावर कच्चे दूध लावणे पडेल महागात, वाचा दुष्परिणाम

Kanda- Lasun Chutney: आजीच्या हातची पाट्यावरची कांदा लसणाची चटणी कशी बनवायची?

Bigg Boss Marathi 6 : "मस्तीत नाही शिस्तीत राहायचं..."; अनुश्रीवर संतापला रितेश भाऊ, कठोर शब्दात केली कानउघडणी-VIDEO

SCROLL FOR NEXT