Prajakta Mali new serial  intagram @prajakta_official
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali New Serial: सूत्रसंचालनाकडून अभिनयाकडे; प्राजक्ता माळीची छोट्या पडद्यावर रिएन्ट्री

Sony Marathi New Serial: प्राजक्ता पुन्हा टीव्ही मालिकेकडे वळली आहे.

Pooja Dange

Post Office Ughad Aahe: अभिनेत्री प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतून आपल्या भेटीला येत असते. 'जुळून येति रेशीमगाठी' ही प्राजक्ता माळीची पहिली मालिका होती. त्यानंतर प्राजक्ता चित्रपट आणि वेबसीरीज असा तिचा प्रवास सुरू आहे. आता प्राजक्ता पुन्हा टीव्ही मालिकेकडे वळली आहे. मालिकांमध्ये प्राजक्ता रिएन्ट्री करत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. मालिकांच्या माध्यमातून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं.

मालिका, चित्रपट, वेबसीरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे.

आता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री होणार आहे. तिच्या या एन्ट्रीने प्राजक्ताच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. तब्बल ६ वर्षांनी प्राजक्ता मालिकेत पुनरागमन करत आहे. तिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिचा चाहतावर्ग नक्कीच खूश होणार आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरेल.

पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात नवीन एन्ट्री झाल्यामुळे आणखी काय पाहायला मिळणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.

प्राजक्ता अभिनयासह अनेक नवनवीन गोष्टी करत असते. तिचा एक कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे. तसेच तिने 'प्राजक्तराज' नावाचा दागिन्यांचा ब्रँड देखील आणला आहे. प्राजक्तराज माध्यमातून तिने व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

Pakistan Protest: जेन झी मैदानात पाकिस्तानात सत्तापालट? नेपाळनंतर पाकमध्येही तरुणाई आक्रमक

SCROLL FOR NEXT