Kangana Ranaut Turns 36: अभिनेत्री कंगना रनौत अभिनयासह तिच्या बेधडक वक्तव्यासाठी देखील ओळखली जाते. आज कंगनाचा वाढदिवस आहे. कंगनाचा जन्म २३ मार्च १९८७ साली हिमाचल प्रदेश येथील भांगला येथे झाला. राजपूत घराण्यात जन्मलेली कंगनाची आई आशा शिक्षिका आहे, तर वडील अमरदीप व्यावसायिक आहेत.
कंगना आज ३६ वर्षाची झाली आहे. तर वाढदिवसशी कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पाहूया या व्हिडिओमध्ये कंगना काय म्हणाली आहे. पाहूया या व्हिडिओमध्ये कंगना काय म्हणाली आहे.
या व्हिडिओमध्ये कंगना तिच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तिचे शुभेच्छुक असलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करत आहे. यासोबतच कंगना व्हिडीओमध्ये तिच्या शत्रूंची माफी मागितली आहे. व्हिडिओमध्ये कंगना रनौत म्हणते, “आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझे आई-वडील, माझी कुलदेवी आई अंबिका आणि माझे सर्व गुरु, माझे सर्व चाहते, हितचिंतक, माझे कुटुंब, मित्र यांचे आभार मानते. "
कंगना पुढे म्हणते, "मी माझ्या शत्रूंचेही आभार मानते, ज्यांनी आजपर्यंत मला कधीच आराम करू दिला नाही. मला यश मिळाले, पण तरीही त्यांनी मला यशाच्या मार्गावरून बाजूला जाऊ दिले नाही, मला लढायला आणि संघर्ष करायला शिकवलं.. मी नेहमीच त्यांचेही कृतज्ञ असेन.
मित्रांनो, माझी विचारधारा अतिशय साधी आहे, माझे आचरण आणि विचारही अतिशय साधे आहेत. मला नेहमी सर्वांचे चांगले व्हावे असे वाटत असते. जर मी तुमचे मन दुखावले असेल तर त्याबद्दल मी माफी मागते. श्री कृष्णाच्या कृपेने मला खूप काही मिळाले आहे. माझ्या मनात कोणासाठीही वाईट भावना नाही."
कंगना रनौत लवकरच 'चंद्रमुखी 2' चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच, कंगनाने चित्रपटातील तिच्या भूमिकेचे शूटिंग पूर्ण केले आहे, त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटाचा सहकलाकार राघव लॉरेन्ससाठी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे. याशिवाय कंगना पीरियड ड्रामा चित्रपट 'इमर्जन्सी'मध्येही दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन तिने स्वत: केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.