Prajakta Mali Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Birthday : आवड नसताना देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली; प्राजक्ता माळीबद्दल 'ही' खास माहिती

Chetan Bodke

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर आहे. प्राजक्ता एक बहुआयामी अभिनेत्री असून होस्ट, उद्योजिका आणि ती सिनेनिर्माती देखील आहे. प्राजक्ता चित्रपट, ओटीटी आणि टिव्ही सीरियल अशा सर्वच प्लॅटफॉर्मवर ती सक्रिय आहे. आज प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे. प्राजक्ता माळीचा आज ३५ वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशी तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया...

नृत्य आणि अभिनयात तरबेज असलेली महाराष्ट्राच्या लाडक्या प्राजूला अभिनयात फारसा रस नव्हता. तिने स्वप्नातही केव्हा पाहिलं नव्हतं की आपण फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री होऊ. प्राजक्ता प्रसिद्ध नृत्यांगना आहे. तिचं संपूर्ण बालपण पुण्यातच गेलं आहे. प्राजक्ताने पुण्यातल्या ललित कला केंद्रात नृत्य विषयात एमए केले आहे. त्याचवेळी योगायोगाने तिची भेट मराठी इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध निर्मात्यांशी झाली. त्यांनी तिला ‘तांदळा’ चित्रपटात पहिली छोटी भूमिका दिली होती. ‘तांदळा’ चित्रपट तिचा पहिला मराठी चित्रपट आहे.

तेव्हापासून ते आजवर प्राजक्ताने मागेवळून पाहिलेले नाही. या चित्रपटानंतर प्राजक्ताला अनेक वेगवेगळ्या मराठी चित्रपटामध्ये ऑफर मिळाल्या. यासोबतच अभिनेत्रीने अभिनयासोबतच होस्टिंग करण्यासही सुरूवात केली. करियरच्या स्ट्रगलच्या सुरुवातीच्या काळात प्राजक्ताने अभिनयासोबतच कार्यक्रमात होस्टिंगचे काम घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे पैशाची गरज भागवण्यासाठी केले. पण त्याचमध्ये ती तरबेज होऊन स्वत:ची एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्राजक्ताला विशेष ओळख 'जुळून येती रेशीम गाठी' मालिकेतून मिळाली. प्रेक्षकवर्गाने मालिकेला भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे प्राजक्ताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं करियर करण्याचे ठरवले. प्राजक्ताने वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांसोबतच ‘रानबाजार’सारख्या वेब सीरिजमध्ये केलेली भूमिका सुद्धा खूप गाजली. 'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता सिनेनिर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निर्माती म्हणून प्राजक्ता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू पाहतेय.

याशिवाय, अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केल्यानंतर प्राजक्ता आता बिझनेसवुमन झाली आहे. प्राजक्ताने २०२२ मध्ये ‘प्राजक्तराज’ नावाचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे. त्यासोबतच प्राजक्ता कवियित्रीही आहे. तिने स्वत: लिहिलेला काव्य संग्रह सुद्धा प्रकाशित झाला आहे. बहुआयामी प्राजक्ता कायम चर्चेच्या अग्रस्थानी असते. प्राजक्ताचा कर्जतमध्ये निसर्गाचा खुशीत स्वत:चा फार्महाऊस देखील आहे. त्या फार्महाऊसमधील ती अनेक फोटोही शेअर करत असते. प्राजक्ताची कहाणी ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. प्राजक्ताने आपल्या कठोर परिश्रमाने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT