Pooja Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

कलरफुल्ल पूजा सावंतचा क्रश कोण?; 'बस बाई बस'मध्ये म्हणाली, त्याच्याशी लग्न झालं तर...

अभिनेत्री पूजा सावंतने 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अनेक खुलासे केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मराठमोळी अभिनेत्री पूजा सांवतने(Pooja Sawant) तिच्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान पक्कं केलंय. झकास, नवरा माझा भवरा, पोस्टर बॉइज, भेटली तू पुन्हा, लपाछपी या चित्रपटामधल्या दमदार अभिनयानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर पूजा कायम सक्रिय असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. अनेकदा पूजा तिच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडींबाबतच्या पोस्ट(Social media) सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच पूजा सांवत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. यावर स्वत: पूजाने मौन सोडत रंजक खुलासा केला आहे.

अभिनेता सुबोध भावे यांच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. हा शो सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या भागापासून गाजतोय. या कार्यक्रमात राजकरणी महिला ते कलाविश्वातील अभिनेत्री, विविध क्षेत्रांतील दिग्गज महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमात महिलांच्या समस्या, त्याचे प्रश्न, वैयक्तिक- व्यवसायिक आयुष्यातील रंजक खुलासे होत असतात.

आतापर्यत या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, अमृता फडणवीस, अमृता खानविलकर यांसारख्या दिग्गज महिलांनी उपस्थिती दर्शविली आहे. अलीकडेच अभिनेत्री पूजा सावंतने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अनेक खुलासे केले आहेत. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

दरम्यान आता या बस बाई बसचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये पूजा सांवत आणि सुबोध भावे सेटवर धम्माल करताना दिसत आहेत. पूजा पारंपारिक वेशामध्ये अतिशय सुदंर दिसते आहे. तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. कानात झुमके, गळ्यात हार, नाकामध्ये नथ अशा वेशभूषेत पूजाचं सौदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.

सुबोध भावे बस बाई बसचं सूत्रसंचलन करतो आहे. कार्यक्रमात सुबोध उपस्थितांशी त्याच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यासंबधी गप्पा मारत असतो. पूजासोबतही त्यानं गप्पा मारल्या. यावेळी पूजाला अभिनेता सिध्दार्थ मल्होत्राचा फोटो दाखवण्यात आला, फोटो पाहून पूजा लाजली. सिद्धार्थ क्रश असल्याची कबुली तिने दिली. तिने "माझं खूप प्रेम आहे. तुझ्याशी लग्न झालं तर मला आवडेल", असं तिनं बिनधास्तपणे सांगितलं. तिचं उत्तर ऐकून सुबोध भावेसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.

पूजा सांवत ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीसह हिदींतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकताच पूजाचा 'दगडी चाळ २' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये तिने 'कलरफुल्ल' भूमिका साकारली आहे. 'बस बाई बस'चा हा स्पेशल एपिसोड रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT