Nora Fatehi Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi Net Worth: कॅनेडनियन असतानाही नोराचं बॉलिवूडमध्ये वर्चस्व; आहे इतक्या कोटींची मालकीण

Nora Fatehi Birthday: आज नोरा फतेही ३२ वा वाढदिवस साजरा करीत असून तिच्या वाढदिवसानिमित्त नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.

Chetan Bodke

Nora Fatehi Net Worth

नोरा फतेही बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेत्री असून ती एक उत्तम डान्सर देखील आहे. अनेक चित्रपटांमध्ये आणि टेलिव्हिजन रिॲलिटी शोमध्येही ती दिसली आहे. नोराने जितकीही गाणी केली ती सगळी सुपरहिट ठरली आहेत. तिच्या ह्या हिट गाण्यांमध्ये 'दिलबर', 'कमंरिया', 'साकी- साकी', 'हाय गर्मी' सह अनेक गाण्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. आज नोरा ३२ वा वाढदिवस साजरा करीत असून आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत. (Bollywood)

नोराने आपल्या सिनेकारकिर्दित हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. नोराने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही अनेक सुपरहिट आयटम साँग प्रेक्षकांना दिले आहेत. नोराचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरा फतेही एका चित्रपटासाठी १ कोटींइतकं मानधन आकारते, तर एका आयटम साँगसाठी नोरा ५० लाख रूपये मानधन आकारते. तर सोशल मीडिया प्रमोशनल पोस्टसाठी नोरा २५ लाख रूपये आकारते. (Bollywood Actress)

नोराकडे अनेक महागड्या कार्स आहेत. तिच्याकडे ६२ लाख रूपयांची BMW 5 20D, तर ३७ लाख रूपयांची Mercedez Benz तसेच 15.24 लाखांची होंडा सिटी आणि 9 लाख रूपयांची व्होल्क्सवॅगन कार यांचा समावेश आहे. नोरा गेल्या १० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असून सध्या ती ३० कोटींपेक्षा जास्त ती वर्षाला कमावते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health Tips: तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? त्याआधी जाणून घ्या महत्त्वाचे उपाय

Jalna Breaking News : जालन्यात मुसळधार पावसाचा कहर, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Raigad : रायगडमध्ये पावसाचा 'हाहाकार'! महाडमध्ये पूरस्थिती, शाळा-कॉलेज बंद | VIDEO

Mumbai 26th July : मुंबईकरांनो सावधान! पुन्हा २६ जुलैचा धोका, समुद्रकिनारी जाणं टाळा, IMD कडून मुसळधारेचा इशारा

SCROLL FOR NEXT