Medha Manjrekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Medha Manjrekar: 'देवाने प्रत्येक टप्प्यावर साथ दिली...'; कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची भावनिक पोस्ट

Medha Manjrekar Cancer: महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती दिली. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशननंतर भावनिक पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले.

Shruti Vilas Kadam

Medha Manjrekar Cancer: मराठी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी स्वतःला कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. उपचारांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत या कठीण प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर उपचारांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल लिहिले आहे. त्यांनी सांगितले की, आयुष्यात असे काही प्रवास असतात जे तुम्हाला कायमचे बदलून टाकतात. हा त्यापैकीच एक आहे. माझ्या उपचारांचा एक टप्पा संपत आला आहे आणि माझा वाढदिवस जवळ येत आहे, तेव्हा मी मागे वळून पाहते. निदानाकडे नाही. शस्त्रक्रियेकडे नाही. केमोथेरपीकडे नाही. रेडिएशनकडे नाही. मला आठवते ती ईश्वरी कृपा. मला आठवतात ते अदृश्य हात, ज्यांनी मला प्रत्येक दिवशी सांभाळून नेले. लोक मला नेहमी विचारतात, “तू यातून कशी बाहेर पडलीस?” याचे उत्तर सोपे आहे. मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही. प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटायचे की मी एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही, तेव्हा कोणीतरी माझ्यासोबत चालायला यायचे. मागे वळून पाहताना मला कळते की, ते योगायोग नव्हते. तो देवाचा माझा हात धरण्याचा एक मार्ग होता.

पुढे त्या म्हणाल्या, या प्रवासात मला जाणवले की, देव नेहमीच आपल्यासमोर दिव्य रूपात प्रकट होत नाही. तो माझ्या आयुष्यात माझे गुरू, माझे डॉक्टर, माझ्या नर्सेस, माझे कुटुंब, माझे मित्र आणि अगदी एकेकाळी अनोळखी असलेली पण नंतर आशीर्वाद बनलेली व्यक्ती म्हणूनही आला. माझ्या गुरूंनी मला शिकवले की शरणागती म्हणजे पराभव नव्हे, तर ती श्रद्धेची सर्वोच्च अवस्था आहे. एकदा मी शरणागती पत्करल्यावर, ‘माझ्यासोबतच का?’ हा प्रश्न विचारणे मी थांबवले आणि प्रत्येक आव्हानामागे एक गहन उद्देश असतो यावर सहज विश्वास ठेवला. माझ्या मुलींनो एक आई आपले आयुष्य या विश्वासाने घालवते की ती नेहमीच आपल्या मुलांचा हात धरून राहील. या प्रवासाने मला आठवण करून दिली की एक दिवस, नकळतपणेच, मुले आपल्या आईचा हात धरू लागतात. माझा हात धरल्याबद्दल धन्यवाद.

महेश, फक्त माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. काही प्रवास कधीही एकट्याने करायचे नसतात आणि मग होता माझा परिवार माझी बहीण माझी सख्खी बहीण. माझे अविश्वसनीय मित्र-मैत्रिणी. तुम्ही प्रेमाचा अर्थच बदलून टाकला तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहिला नाहीत. तुम्ही हजर राहिलात. तुम्ही घरी आलात. तुम्ही आळीपाळीने माझ्यासोबत राहिलात. तुम्ही मला हसवले. तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना केली. तुम्ही माझे लक्ष विचलित केले. असे त्या म्हणाल्या.

तुम्ही याची खात्री केली की मला माझे सर्वात कठीण दिवस कधीही एकट्याने काढावे लागणार नाहीत. तुमच्यापैकी काहीजण तर फक्त माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी परदेशातूनही प्रवास करुन आलेत. जेव्हा उपचारांमुळे माझी भूक नाहीशी झाली, तेव्हा मी काय खाऊ शकेन हे कोणालातरी नेहमीच माहीत असायचं. ढोकळ्यांचा डबा. मऊ इडली. गुलपापडी. ज्या दिवशी मला अचानक पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली, त्या दिवशी ती मिळायची. साधं अन्न... अतुलनीय प्रेमाच्या आवरणात गुंडाळलेलं. एका मैत्रिणीने सुचवलं की मी माझा क्रॅनबेरी ज्यूस शॅम्पेनच्या ग्लासमधून प्यावा. सादरीकरणात एक छोटासा बदल दृष्टिकोनात एक मोठा बदल. तीच मैत्रीण असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT