Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

किशोरी शहाणे यांच्या गाडीचा अपघात, समोरून येणाऱ्या ट्रकने दिली धडक

सोशल मीडिया फोटो पोस्ट करत त्यांनी कार अपघात झाल्याची माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - ‘गुम है किसी के प्यार में’ या टीव्ही मालिकेत भवानी चव्हाणची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा अपघात (Accident) झाला आहे. पुण्यातील (Pune) मावळ येथे ही घटना घडली आहे. महामार्गावर त्यांची कार एका ट्रकला धडकली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती किशोरी शहाणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. गाडीची अवस्था पाहून गाडीतील प्रवासी थोडक्यात बचावले असे म्हणता येईल.

किशोरी शहाणे यांनी इंस्टाग्रामवर अपघातग्रस्त कारचे तीन फोटो पोस्ट केले आहे. या अपघातात कारचे नुकसान झाले परंतु देवाच्या आशिर्वादाने आमचा जीव बचावला. मात्र, कारमधील सर्वजण सुखरूप आहे. जाको रखे सैया मार खाके ना कोई…’ या कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.

किशोरी शहाणे या टेलिव्हिजन आणि बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. किशोरी शहाणे गेल्या ३ दशकांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. ‘गुम है किसी के प्यार में’ या टीव्ही शोमध्ये भवानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री किशोरी शहाणेला चांगलीच पसंती मिळत आहे. त्यापूर्वी त्या ‘बिग बॉस’च्या घरात देखील दिसल्या होत्या.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT