Kajol Devgan New Web Series Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Kajol Devgan Promotion: आयुष्यातील सगळ्यात कठीण काळाचा सामना करणाऱ्या काजोलचं प्रमोशनल ड्रामा पाहून नेटकरी संतापले...

Kajol Devgan New Web Series Announcement: सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी काही तरी भन्नाट काम करत आपल्या चित्रपटाचं आणि वेबसीरिजचं प्रमोशन करतात. असंच काहीसं प्रमोशन काजोल देवगणने तिच्या वेबसीरिजसाठी केलं आहे.

Chetan Bodke

Kajol Devgan Break From Social Media: बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. काल तिने सोशल मीडियावरून मी ब्रेक घेतल्याची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली. अभिनेत्रीने ही घोषणा केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी याबद्दल सर्वांनीच चिंता व्यक्त करत तिला काळजी घेण्यासाठी सांगितले. अखेर अभिनेत्रीला हा स्टंट का करावा लागला ?, या मागील नेमकं कारण काय ? हे अखेर स्पष्ट झालं.

सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी काही तरी भन्नाट काम करत आपल्या चित्रपटाचं आणि वेबसीरिजचं प्रमोशन करतात. सोशल मीडियावर खरंच सेलिब्रिटींना प्रमोशन करणं खूपच सोप्पं झालं आहे. असंच काहीसं काल सोशल मीडियावर अभिनेत्री काजोल देवगणनं केलं. “मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळामधून जात आहे.” अशी पोस्ट तिने काल सोशल मीडियावर केली. ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली. इतकंच नाही तर तिने सोशल मीडियावरील अनेक पोस्ट ही डिलीट केल्या, हे दुसरं तिसरं काही नसून तिच्या आगामी वेबसीरिजच्या प्रमोशनचीही अनोखी युक्ती होती.

काजोलची डिज्ने प्लस हॉटस्टारवर एक नवीन वेबसीरिज येत आहे.  ‘द ट्रायल-प्यार, कानुन, धोका’ असं तिचं नाव असून येत्या १२ जूनला वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर वेबसीरिजचा टीझर सारखा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर तिचा हा टीझर पाहून कमलीचे संतापले आहे. सोशल मीडियावर तिला नेटकऱ्यांनी प्रमोशनसाठी काहीही करायचं का असं म्हणत तिला ट्रोल केलंय.

जेव्हा काजोलने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली, त्यावेळी तिला चाहत्यांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला. तिचा प्रमोशनल ड्रामा पाहून नंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर काजोलला तुफान ट्रोल केले आहे. “यापुढे तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, अशे स्टंट करणं किमान थांबवा, हे योग्य नाही.” अशा प्रकारे प्रमोशन करणं चुकीचं असून तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT