अभिनेत्री काजोल कोरोनाच्या विळख्यात; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...  Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री काजोल कोरोनाच्या विळख्यात; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेने देशाला चांगलाच तडाखा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कोरोना व्हायरसच्या (Corona) तिसर्‍या लाटेने देशाला चांगलाच तडाखा दिला आहे. अलीकडच्या काळामध्ये बर्‍याच लोकप्रिय सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. तर, अनेक कलाकार यामधून लवकर बरे देखील झाले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री (Actress) काजोल (Kajol) देखील या विषाणूच्या विळख्यामध्ये अडकली आहे.

हे देखील पहा-

अभिनेत्रीने आज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. स्वतःचा फोटो शेअर करण्याऐवजी काजोलने तिची मुलगी न्यासा देवगणचा (Nysa Devgan) फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिली आहे. काजोलला तिचा स्वतःचा फोटो पोस्ट करायचा नव्हता, तिचे लाल नाक कोणी बघू नये, अशी तिची इच्छा आहे.

अभिनेत्रीने लेक न्यासा देवगणचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये न्यासाच्या हातावर सुंदर मेहंदी दिसत आहे. याबरोबरच काजोलने लिहिले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे आणि माझे लाल नाक कोणीही बघू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण जगात सर्वात गोड हास्य कायम ठेवू. मिस यु न्यासा.’ दरम्यान, न्यासा सध्या सिंगापूर मधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत आहे. याअगोदर ती शालेय शिक्षणाकरिता सिंगापूरमध्ये होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, पुण्यात म्हशीच्या पोटी रानगव्याचं रेडकू | VIDEO

Cash Rule: घरात २० हजारांची कॅश ठेवताय तर कारवाई होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Gopichand Padalkar Controversy : फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर बेताल,जयंत पाटलांवर पुन्हा खालच्या पातळीवर टीका

Dasara Melava: महाराष्ट्रात आज ५ दसरा मेळावे, कधी आणि कुठे कोण बोलणार? ठाकरे आणि शिंदेंकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT