Jui Gadkari Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari Post: 'ठरलं तर मग' मालिकेतील असिस्टंटचा भीषण अपघात, आठ दिवस कोमात; जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली, चुक कोणाची?

Jui Gadkari Facebook Post Viral: नुकतीच जुईने एक फेसबुक पोस्ट केली आहे. जी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. जुईने सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने गाड्या जपून चालवण्याचे आवाहन केले आहे.

Manasvi Choudhary

टिव्ही वरील 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. वर्षभरापासून हि मालिका टिआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीला प्रेक्षकांची विशेष पसंती आहे. मालिकेत जुई सायलीच्या भूमिकेत आहे. सोशल मीडियावर जुई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे मत सोशल मीडियावर मांडत असते. नुकतीच जुईने एक फेसबुक पोस्ट केली आहे. जी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. जुईने सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने गाड्या जपून चालवण्याचे आवाहन केले आहे.

अभिनेत्री जुईने फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये जुईने, 'अगदी काल परवा पर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरच होतं ना... मला वर्षानु वर्षे त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा... पण निदान त्या मुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा... घरी ऊशीरा जात असाल पण सुखरूप पोहचत होता!

मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची??? माझी वाट बघणार घरी कोणी नाही... पण तुमची वाट बघणारे आहेत... काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा... पावसाळा येतोय... पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्किड होतात... तर स्वता:ची आणि इतरांची पण काळजी घ्या.'- तुमचाच (लाडका) रस्ता'

पुढे तिने, 'गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघुन डोकं सुन्नं झालय... त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे... गेले ७-८ दिवस कोमात आहे... प्लिज गाड्या हळु चालवा.' असं म्हटंलय. जुईने पोस्टमध्ये तिच्या चाहत्यांना पावसाळ्याचे दिवस सुरू होत असून गाड्या जपून चालवण्याचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर जुईच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. "खुप महत्वाची माहिती" तर आणखी एकाने, "लवकर तुमचा असिस्टंट बरा व्हावा, हीच देवाकडे प्रार्थना" अशा प्रतिक्रियां आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT