Jennifer Winget Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Jennifer Winget Marriage: अभिनेत्री जेनिफर विंगेटने विल्यम इश्माएलसोबत ख्रिश्चन पद्धतीने दुसरे लग्न केल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर लग्नाचे खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी.

Shruti Vilas Kadam

Jennifer Winget Marriage: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर जेनिफरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे. अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड विल्यम इश्माएल याच्यासोबत लग्न केल्याची घोषणा केली आहे.

शनिवारी जेनिफरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. ख्रिश्चन पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात जेनिफर पांढऱ्या रंगाच्या ब्रायडल गाउनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. तर विल्यम इश्माएल निळ्या रंगाच्या सूटमध्ये स्मार्ट दिसत होता. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पोस्टमधील एका फोटोमध्ये जेनिफर आणि विल्यम हातात हात घालून उभे असल्याचे दिसते. यावेळी जेनिफर तिच्या लग्नाची अंगठीही अभिमानाने दाखवत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये हे कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे. या रोमँटिक फोटोंसोबत जेनिफरने विल्यमला टॅग करत, 'And finally, our stars aligned' (अखेर आमचे नशीब एकत्र आले) असे कॅप्शन दिले.

याशिवाय एका व्हिडिओ पोस्टमध्ये तिने चाहत्यांना आपल्या पतीची ओळख करून देताना, 'आमचे लग्न झाले आहे. देवियो और सज्जनों... मी तुम्हा सर्वांना माझ्या पतीची ओळख करून देत आहे,' असे लिहिले. तिची ही पोस्ट समोर येताच चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दरम्यान, जेनिफर विंगेटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने २०१२ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत विवाह केला होता. मात्र, दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जेनिफरने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Maharashtra News Live Update: सीबीआयचे पथक पुन्हा लातूरमध्ये, न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवराज मोठेगावकर च्या क्लासेसची चौकशी सुरू

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का! बंडखोर ६ खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

Dr. Kumar Saptarshi : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन

SCROLL FOR NEXT