Ishika Taneja SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ishika Taneja : ममता कुलकर्णीनंतर आणखी एका अभिनेत्रीने घेतला संन्यास, महाकुंभमधील व्हिडीओ व्हायरल

Actress Ishika Taneja Quits Bollywood : आता बॉलिवूड अभिनेत्री इशिका तनेजा चर्चेत आली आहे. तिने बॉलिवूड सोडून संन्यास घेतला आहे. अभिनेत्री आता सनातन धर्माचा प्रचार करत आहे.

Shreya Maskar

सध्या प्रयागराज येथे 'महाकुंभ मेळा 2025' सुरू आहे. अनेक कलाकारांनी या महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे. महाकुंभ मेळ्यामुळेच अभिनेत्री इशिका तनेजा (Ishika Taneja) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने बॉलिवूडला रामराम ठोकून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. याची सुरूवात अभिनेत्रीने महाकुंभ मेळ्यातून केली आहे. इशिकाने आपले नाव बदलून 'श्री लक्ष्मी' असे ठेवले आहे. सध्या अभिनेत्री सनातन धर्माचा प्रचार करताना दिसत आहे.

अभिनेत्री इशिका तनेजा हिने शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आहे. हे शंकराचार्य मध्यप्रदेशातील जबलपूर याठिकाणाच्या द्वारका-शारदा पीठाचे आहेत. इशिका तनेजाने 29 जानेवारीला महाकुंभ मेळ्याला भेट दिली. इशिका तनेजाने महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले. अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यावर इशिका म्हणते की, "तिला नाव आणि प्रसिद्धी मिळूनही तिचे आयुष्य अपूर्ण वाटू लागले. प्रत्येक मुलीने धर्माचे रक्षण आणि प्रचार केला पाहिजे. मुलींनी सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा आणि कालीचे रूप घ्यावे. "

सध्या इशिकाचे महाकुंभ मेळ्यातील अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. चित्रपटसृष्टी सोडण्याबाबत इशिका म्हणाली की, "मला आयुष्यात शांती मिळत नव्हती. म्हणून मी शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेऊन सनातन धर्माचा प्रचार करण्यास सुरुवात केली."

अभिनेत्री इशिका तनेजा दिल्लीची आहे. तिचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. तसेच इशिका तनेजा 'मिस वर्ल्ड टुरिझम इंडिया' ठरली आहे. इशिका तनेजाला 'इंदू सरकार' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली होती. इशिका तनेजाने 'बिझनेस वुमन ऑफ द वर्ल्ड'चा किताब देखील जिंकला आहे. तिला राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने अनेक गाणी , सीरिज देखील केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

Kidney Racket : ५० हजार घेतले, ७४ लाख झाले; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या, विदर्भातील प्रकरणाने राज्यात खळबळ

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

SCROLL FOR NEXT