Kanni Release Date Instagram
मनोरंजन बातम्या

Kanni Release Date: 'मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी'...'; 'मन उडू उडू...'नंतर ह्रता आणि अजिंक्यची जोडी पुन्हा एकत्र दिसणार

Kanni Poster Out: मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री हृता दुर्गुळेने नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

Chetan Bodke

Kanni Release Date

'अनन्या', 'टाईमपास ३' चित्रपटातून तसेच त्याआधी 'दुर्वा', 'फुलपाखरु' आणि 'मन उडू उडू झालंय' यांसारख्या कलाकृतींमधून हृताने प्रेक्षकांचे मन जिंकले. आपल्या सौंदर्यामुळे आणि खास अभिनय शैलीच्या जोरावर अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीमध्ये आपले स्थान प्रस्थापित केले आहे. अशातच अभिनेत्रीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीने नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. " मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी'... ८ मार्च पासून सर्व चित्रपटगृहांत! " असं कॅप्शन देत अभिनेत्रीने पोस्टर शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लारै विराज आणि ऋषी मनोहर अशी स्टारकास्ट पोस्टरमध्ये दिसत आहे.

पोस्टरमध्ये, तिने एका टॉवरला कवटाळलेलं दिसत आहे. आणि तिच्यासोबत बाकीचेही कलाकार तिच्याकडे बोट करताना दिसत आहे. चित्रपटाच्या कथानकाबद्दल चाहत्यांना खूपच उत्सुरकता आहे.

हृताने 'अनन्या' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हृताने गेल्या वर्षी तिच्या वाढदिवशी अर्थात १२ सप्टेंबरला 'कन्नी' चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर जोशी यांनी संभाळली आहे. ह्रता आणि अजिंक्य 'मन उडू उडू झालं' या मालिकेनंतर 'कन्नी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उंचच उंच आकाशात उडायचे असेल तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची 'कन्नी' असे म्हणत हृताने 'कन्नी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT