Gargi Phule Joins NCP Instagram @gargiphule
मनोरंजन बातम्या

Gargi Phule Joins NCP: निळू फुलेंची मुलगी राष्ट्रवादीच्या वाटेवर; गार्गी फुलेंचा अजित पवारांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश

Gargi Phule In Politics : अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे.

Rashmi Puranik

Nilu Phule's Daughter Gargi Phule Joins NCP: ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गार्गी फुलेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

गार्गी फुले यांनी B. A., M. A.in Women Liberation मध्ये पदवी घेतली आहे. 1998 पासून प्रायोगिक नाट्य चळवळीशी गार्गी संबंधित आहेत. सत्यदेव दुबे त्यांच्या शिष्या आहेत. समन्वय या नाट्यसंस्थेसह अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुलेने काम केले आहे. (Latest Entertainment News)

मळभ (किरण यज्ज्ञपावीत), कोवळी उन्हे (विजय तेंडुलकर), श्रीमंत (विजय तेंडुलकर), सोनाटा (महेश एलकुंचवर), वासंसी जीर्णनी (महेश एलकुंचवर), सुदामा के चावल (वसंत देव), या नाटकात गार्गी फुलेने काम केले आहे.

तुला पाहते रे (zee टीव्ही), कट्टी बट्टी (zee युवा), राजा राणी ची गं जोडी (colors मराठी), सुंदरा मनामध्ये भरली (colors मराठी), या टीव्ही मालिकांमध्ये गार्गी फुलेने काम केले आहे. (Movie)

पोस्टर गर्ल, आंबेडकर, मी र. धों. कर्वे, संध्या छाया, रिश्ते, या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरीजमध्ये देखील अभिनय कला आहे. अनेक नाटकांचे कॉस्ट्यूम डिझाइन गार्गी फुलेने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT