Actress File Complaint Against Film Producer Saam TV
मनोरंजन बातम्या

FIR Against Producer: 7500 रुपयांचा वाद, अभिनेत्रीची चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार

Actress File Complaint Against Film Producer: या अभिनेत्रीला सतत अज्ञात व्यक्तीकडून फोन येत आहेत. या त्रासाला कंटाळून शेवटी या प्रकरणी अभिनेत्रीने ओशिवरा पोलिस ठाण्यात (Oshiwara Police Station) धाव घेत निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Priya More

Oshiwara Police Station:

अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्याविरोधात (Film Producer) पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्याची घटना समोर आली आहे. अनोळखी व्यक्तीला फोन नंबर देऊन बदनामी केल्याचा आरोप या अभिनेत्रीने निर्मात्यावर केला आहे. या अभिनेत्रीला सतत अज्ञात व्यक्तीकडून फोन येत आहेत. या त्रासाला कंटाळून शेवटी या प्रकरणी अभिनेत्रीने ओशिवरा पोलिस ठाण्यात (Oshiwara Police Station) धाव घेत निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री जोगेश्वरी येथे राहते. २०१८ मध्ये तिची एका चित्रपट निर्मात्यासोबत ओळख झाली होती. मे २०२३ मध्ये या निर्मात्याने अभिनेत्रीकडून ४००० रुपये उसने घेतले होते. पण दुसऱ्याच दिवशी त्याने ते परत केले. त्यानंतर जूनल २०२३ मध्ये त्याने परत तिच्याकडून ७,५०० रुपये उसने घेतले. पण हे पैसे त्याने अभिनेत्रीला परत दिलेच नाही. आपले उसने पैसे परत करावे यासाठी अभिनेत्री निर्मात्याला वारंवार फोन करत होते. पण तो फोन उचलत नव्हता.

आपले उसने घेतलेले पैसे परत न मिळाल्यामुळे अभिनेत्रीने १९ फेब्रुवारीला फेसबुकवर स्टोरी शेअर केली होती. या फेसबुक स्टोरीनंतर चित्रपट निर्मात्याने अभिनेत्रीला तिचे फोटो पॉर्नवेबस्टाईटवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर अभिनेत्रीला वारंवार अज्ञात व्यक्तीकडून फोन येऊ लागले. सतत येणाऱ्या फोनमुळे ही अभिनेत्री वैतागली आणि शेवटी तिने ओशिवरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तिने चित्रपट निर्मात्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT