Rajesh Khanna And Dimple Kapadia Love Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dimple Kapadia Birthday : १६ व्या वर्षीच केलं ३१ वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न, ९ वर्षातच झाला घटस्फोट; सध्या डिंपल कपाडिया काय करतात ?

Dimple Kapadia Career : डिंपलने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ३१ वर्षीय राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले आणि त्यानंतर डिंपल आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आल्या. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या लव्हलाईफबद्दल जाणून घेऊया...

Chetan Bodke

डिंपल कपाडिया अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहायल्या आहेत. डिंपलने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ३१ वर्षीय राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले आणि त्यानंतर डिंपल आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आल्या. आज डिंपल कपाडिया यांचा ६७ वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी एका गुजराती परिवारामध्ये झाला होता. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी निगडित काही महत्त्वाच्या पैलूंविषयी जाणून घेऊया, तसेच डिंपल फिल्मी दुनियेपासून दूर गेल्यानंतर आता काय करत आहेत, हे देखील जाणून घेऊया.

७० आणि ८० च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली डिंपल कपाडिया आज फिल्मी दुनियेपासून दूर आहे. डिंपलला चित्रपटात आणण्याचे श्रेय राज कपूर यांना जाते. डिंपलचे वडील चुन्नीभाई कपाडिया खूप श्रीमंत होते, ते पेशाने बिझनेसमन होते. त्यांच्या घरी मोठमोठ्या पार्ट्या असायच्या. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतले अनेक सेलिब्रिटीही उपस्थित राहायचे. त्यावेळी त्या पार्टीमध्ये अनेकदा राज कपूरही उपस्थित राहायचे.

वडिलांच्या ओळखीने डिंपल यांना फार कमी वयात 'संघर्ष' चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली होती. पण त्यांना काही कारणांमुळे ती भूमिका नाकारली गेली. डिंपलने 'बॉबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. या चित्रपटात त्या ऋषी कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत होत्या. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. राजेश खन्नासोबत डिंपल यांची पहिली भेट चित्रपटात येण्यापूर्वीच झाली होती. अहमदाबादच्या नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये दोघांची भेट झाली. हिमांशू भाई व्यास यांनी सांगितले होते की, राजेश खन्ना 70 च्या दशकात त्या स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख पाहुणे होते. त्याचवेळी राजेश खन्ना यांनी डिंपलला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडले आणि इथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली.

राजेश आणि डिंपलच्या वयात १५ वर्षांचे अंतर होते. दोघांनीही डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांनी 1973 मध्ये लग्न केले होते. राजेश खन्नांसोबत लग्न केल्यानंतर डिंपल ११ वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्या, त्याच काळात ट्विंकल आणि रिंकी यांचा जन्म झाला. त्या काळातही डिंपलला चित्रपटात काम करायचे होते, पण राजेश खन्ना यांना डिंपलने चित्रपटामध्ये काम करणे पसंत नव्हते. दोघांमधील मतभेदांमुळे त्यांच्या नात्यातील अंतर वाढू लागले आणि नऊ वर्षानंतर डिंपल आणि राजेश खन्ना यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्नांपासून विभक्त झाल्यानंतर डिंपलने 'सागर' चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. तेव्हापासून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

डिंपल कपाडिया एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण सोबतच ती यशस्वी व्यावसायिक महिलाही आहे. अभिनेत्री होममेड डिझायनर मेणबत्त्यांचा बिजनेस करते. 'फार अवे ट्री' असे तिच्या कंपनीचे नाव आहे. डिंपलच्या कंपनींमध्ये मिळणाऱ्या मेणबत्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या खास औषधी वनस्पतींपासून बनवल्या जातात. त्यांना मेणबत्त्यांची प्रचंड आवड आहे. त्या जेव्हा परदेशात जायच्या तेव्हा तिथून मेणबत्त्या विकत घ्यायच्या आणि त्यांचं कलेक्शन करायच्या. कालांतराने त्यांनी स्वतः मेणबत्त्या बनवायचे ठरवले. यासाठी डिंपलने परदेशात प्रशिक्षणही घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: पूल नसल्याने गावकऱ्यांचा जीवाघेणा प्रवास, तुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून काढली वाट; पाहा VIDEO

Amruta Khanvilkar: 'जाळ अन् धूर...' अमृताच्या नव्या लूकनं सोशल मीडियावर धुमाकूळ

Train Accident : कर्जत-लोणावळाजवळ रेल्वेचा अपघात; मालगाडी रुळावरून घसरली, VIDEO

Maharashtra Live News Update : बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विध्यार्थीना विषबाधा

Akkalkuwa News : मृत्यूनंतरही मरण यातना संपेना; पुराच्या पाण्यातून काढावी लागते अंत्ययात्रा

SCROLL FOR NEXT