Dia Mirza Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dia Mirza: 'लिप फिल कर, ब्रेस्ट साइज वाढवं...'; काम मिळवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाला धक्कादायक सल्ला

Dia Mirza: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने चित्रपटसृष्टीतील ब्युटी स्टँडर्ड्सवर भाष्य केले आहे. तिने लिप इंजेक्शन, ब्रेस्ट ऑगमेंटेशन आणि सौंदर्यावरील दबावाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Shruti Vilas Kadam

Dia Mirza: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही तिच्या अभिनयासह तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. सामाजिक विषयांवर निर्भीडपणे मत मांडणारी दिया नुकतीच चित्रपटसृष्टीतील 'ब्युटी स्टँडर्ड्स' आणि महिलांवर अधिक सुंदर दिसण्यासाठी स्वत:ला बदलण्यासाठी करण्यात येणाऱ्या दबावाबाबत बोलली. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगताना तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

दियाने सांगितले की, जेव्हा तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तेव्हा अनेकांनी तिच्या नैसर्गिक रूपात बदल करण्याचा सल्ला दिला. अधिक आकर्षक दिसण्यासाठी 'लिप इंजेक्शन्स' घेण्यासह 'ब्रेस्ट ऑगमेंटेशन' करण्याचा सल्ला तिला वारंवार दिला जात होता. विशेष म्हणजे, हे सल्ले तिला कोणत्याही महिलेने नव्हे, तर नेहमी पुरुषांकडूनच मिळाले.

एका मुलाखतीदरम्यान दियाला वय किंवा रूपावरून भेदभावाचा सामना करावा लागला का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तिने सांगितले की, तिच्या दिसण्याबाबत अनेकदा टिप्पणी केली जात असे. "तुझे ओठ मोठे कर, शरीराची ठेवण बदल, अधिक ग्लॅमरस दिस," अशा प्रकारचे सल्ले मला दिले जात होते. मात्र, कोणत्याही महिलेने मला कधीही लिप इंजेक्शन्स किंवा शरीरात बदल करण्याचा सल्ला दिला नाही, असे तिने स्पष्ट केले.

या सततच्या टिप्पण्यांचा आपल्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाल्याचेही दियाने कबूल केले. त्या काळात स्वतःमध्ये काहीतरी कमी असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, दोन मोठ्या सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतरही तिला अशा प्रकारच्या टीका आणि सल्ल्यांचा सामना करावा लागत होता. त्यावेळी ती २० वर्षांपेक्षाही कमी वयाची होती.

दियाने सांगितले की, दिग्दर्शक, निर्माते आणि स्वतःला सौंदर्याचे जाणकार समजणारे अनेक लोक तिच्या रूपात बदल करण्याचा आग्रह धरत असत. मात्र, कालांतराने तिने स्वतःला जसे आहे तसे स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

Punjab Politics: भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होणार की तुटणार? दोन्ही पक्षातील नेमका तिढा काय?

खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

SCROLL FOR NEXT