Pooja Sawant And Siddhesh Chavhan Engagement Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Engagement: कलरफुल पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो आला समोर

Pooja Sawant And Siddhesh Chavhan: कलरफुल अभिनेत्री पुजा सावंत हिने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत मुंबईमध्ये गुपचूप साखरपुडा आटोपला आहे.

Chetan Bodke

Pooja- Siddhesh Engagement

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतली कलरफुल अभिनेत्री पुजा सावंत हिच्या लग्नाबद्दलची चर्चा रंगली होती. अनेकदा तिच्या लग्नाचे प्लॅन्सही चाहत्यांसमोर आले होते. अशातच, अभिनेत्रीने आज मुंबईमध्ये गुपचूप साखरपुडा आटोपला आहे. बॉयफ्रेंड सिद्धेशसोबत पुजाने गुपचूप साखरपुडा आटोपला आहे. सध्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

पूजाने चाहत्यांना बॉयफ्रेंडबद्दलची माहिती नोव्हेंबर महिन्यातच दिली होती. तेव्हापासून चाहत्यांना तिच्या साखरपुड्याबद्दल आणि लग्नाबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर अभिनेत्रीने कोणालाही न कळवता मुंबईमध्ये १६ फेब्रुवारीला अर्थात आज गुपचूप साखरपुडा आटोपला आहे. पूजा आणि सिद्धेश दोघांनीही खास साखरपुड्यासाठी खास मराठमोळा आऊटफिट केला होता.

पूजाने साखरपुडा सोहळ्यासाठी हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, हार असा मराठमोळा साज अभिनेत्रीने केला होता. तर, पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याने अर्थात सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता. सध्या दोघांच्याही लूकचे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. पूजा आणि सिद्धेश दोघेही खास मराठमोळ्या अंदाजामध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. यावेळी साखरपुड्याला अनेक मराठी सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

पूजा- सिद्धेशच्या साखरपुड्यासाठी भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर, फुलवा खामकर आणि गश्मीर महाजनी अशे मोजक्याच सेलिब्रिटींनी तिच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. २८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने त्याचं नाव सांगत त्याची चाहत्यांसोबत ओळखही करुन दिली. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.

पूजा सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, पूजा नुकतीच पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली होती. प्रमुख भूमिकेत पूजासोबत पुष्कर जोग, दिशा परदेशी, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. पूजाने क्षणभर विश्रांती, दगळी चाळ, दगळी चाळ २, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. तिचे यातील अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT