Chhaya Kadam SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaya Kadam : कपाळावर टिळा अन् पारंपरिक साज; मराठमोळी अभिनेत्री पंढरीच्या वारीत, पाहा VIDEO

Chhaya Kadam Pandharpur Wari Video : अभिनेत्री छाया कदम वारीत सहभागी झाली आहे. याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा अनुभव कसा होता, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र वारीचा उत्साह पाहायला मिळत आहेत. वारकरी विठ्ठलाचा गजर करत पंढरपूरला (Pandharpur Wari) जात आहेत. या वारीत सामान्यपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण सहभागी होत आहेत. आपला वारीचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगतात. अलिकडेच मराठी अभिनेत्री सायली संजीव वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.

वारीचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने (Chhaya Kadam ) घेतला आहे. तिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री छाया कदम वारीत सहभागी झाली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वारीत दर्शन घेताना दिसत आहे. तसेच तिने वारकऱ्यांसोबत फुगडी देखील घातली आहे.

छाया कदम लूक

छाया कदम वारीत पारंपरिक पोशाखात पाहायला मिळाली. तिने सुंदर साडी नेसली होती. साडीत त्यांचे सौंदर्य खुललं होते. नाकात नथ, केसात गजरा आणि डोक्यावर टिळा लावून विठ्ठल भक्तीत छाया कदम तल्लीन झालेली पाहायला मिळत आहे. ती व्हिडीओमध्ये हातात बांगड्या भरताना देखील दिसत आहे.

अभिनेत्रीचा हा वारीचा पहिला अनुभव होतात. तिने या पोस्टला खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की,"पहिलीच वारी जणू जन्मास उभारी...||विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल||याची देही याची डोळा,ऐसा देखिला सोहळा..." छाया कदमच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री वारीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. अभिनेत्रीने वारीत खेळ देखील खेळले आहेत. छाया कदमचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने मराठी आणि हिंदीत काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT