Naseeruddin shah : "ही जुमला पार्टीची घाणेरडी चाल"; नसीरुद्दीन शाहचा दिलजीत दोसांझला सपोर्ट, नेमकं प्रकरण काय?

Diljit Dosanjh Sardaar Ji 3 Controversy : 'सरदारजी 3' वादाप्रकरणी नसीरुद्दीन शाह यांनी दिलजीत दोसांझला पाठिंबा दिला. त्यांनी एक ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Diljit Dosanjh Sardaar Ji 3 Controversy
Naseeruddin shah SAAM TV
Published On

लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या त्याचा चित्रपट 'सरदार जी 3'मुळे (Sardaar Ji 3) चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत पाकिस्तानी अभिनेत्री झळकली आहे. चित्रपटात हानिया आमिरची महत्त्वाची भूमिका आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर देशात बंदी घातली. त्याला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले आहे.

दिलजीत दोसांझला ट्रोल केल्यानंतर यावर अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin shah) यांनी ट्विट करत प्रतिक्रिय दिली होती. नसीरुद्दीन शाह यांच्या ट्विटनुसार, त्यांनी दिलजीत दोसांझला पाठिंबा दिला. ते म्हणाले, "चित्रपटाच्या कास्टिंगचा निर्णय हा दिलजीत नव्हता. तर दिग्दर्शकाचा होता. चित्रपटात दिलजीतने कलाकार समजून काम केले आहे. ही जुमला पार्टीची घाणेरडी चाल आहे. "

पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले की, "माझे पाकिस्तानमध्ये काही नातेवाईक आणि मित्रमंडळी आहेत. मी त्यांना भेटणार. कोणीही अडवू शकत नाही." नसीरुद्दीन शाह यांच्या या पोस्टमुळे देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता नसीरुद्दीन शाह यांनी ही पोस्ट हटवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून वाद आणि चर्चांना उधाण आले आहे.

Naseeruddin shah
Naseeruddin shah

'सरदार जी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'सरदार जी 3' चित्रपट 27 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 18 कोटींचा टप्पा पार केला आहे. पाकिस्तानमध्ये 'सरदार जी 3' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Diljit Dosanjh Sardaar Ji 3 Controversy
Vidya Balan : विद्या बालनची मराठी इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री; 'या' मालिकेत दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com