Apurva Nemlekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेंवता'ची सिंगापूर ट्रिप, खास व्यक्तीसोबतचे फोटो केले शेअर

Apurva Nemlekar Shared Her Photos :सध्या अपूर्वा नेमळेकर सुट्टी एन्जॉय करत आहे. अपूर्वाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Manasvi Choudhary

रात्रीस खेळ चाले, आभास, बिग बॉस मराठी यासांरख्या टिव्हीवरील कार्यक्रमातून घराघरातत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर कायमच चर्चेत असते. अपूर्वाला 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून खरी ओळख मिळाली. या मालिकेतील तिची 'शेवंता' या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली. आता सध्या अपूर्वा नेमळेकर सुट्टी एन्जॉय करत आहे. अपूर्वाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. कधी फोटो तर कधी आगामी चित्रपटाची माहिती अपूर्वा तिच्या चाहत्यासोबत शेअर करते. सध्या अपूर्वा सिंगापूरमध्ये आहे. तिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. आईसोबत अपूर्वाने खास हा सिंगापूर दौरा केला आहे. सोशल मीडियावर हटके अंदाजात अपूर्वाने तिचे आणि आईचे फोटो पोस्ट केले आहेत.

अपूर्वाने मुंबई ते सिंगापूर असा विमानाने प्रवास केला आहे. आईसोबतचा तिचा हा प्रेरणादायी प्रवास तिने शेअर केला आहे. अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने कलरफुल फ्लोरल गाऊन परिधान केला आहे. सोबत हॅट घेतली आहे. अपूर्वाचा पिकनीक लूक लक्ष वेधतो आहे. अपूर्वा स्टारबक्स कॉफीचा पिताना दिसते आहे.

अपूर्वाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये सांगितलं की, आईला मी खूप कंटाळा आलाय, कुठेतरी निघून जावंस वाटतंय असं म्हटलं होतं. पुढे आम्ही सिंगापूरला जायचं ठरवून झोपून गेलो होतो. सकाळी तिकीट बुक केले आणि निघालो असं म्हटलं आहे. अपूर्वाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स येत आहेत. अनेकांनी तिला लव्ह इमोजीसह आई आणि मुलींच्या नात्यावर सुंदर म्हटलं आहे. अनेकदा कलाकारांना त्यांच्या व्यग्र कामातून परिवाराला वेळ देता येत नाही. मात्र अपूर्वाने खास आईसोबतची तिची ट्रिप केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT