Kirron Kher tested Covid Positive Instaggram @kirronkhermp
मनोरंजन बातम्या

Kirron Kher Covid Positive: किरण खेर कोविड पॉजिटीव्ह; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Kirron Kher Corona News: किरण खेर याना कोविडची लागण झाली आहे.

Saam Tv

Kirron Kher Tested Covid Positive: अभिनेत्री, अनुपम केर यांची पत्नी आणि राजकीय नेत्या किरण खेर याना कोविडची लागण झाली आहे. किरण यांची त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वंना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

किरण खेर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेले सर्वांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्या.' किरण यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यांचे फॅन्स आणि वेल विशर्सनी त्या लंकेवर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रर्थना केली आहे.

किरण खेर यांना 2021 मध्ये मल्टीपल मायलोमा या ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. किरण खेर अनेक उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर आणि मुलगा सिकंदर खेर यांनी त्यांचा कॅन्सर आता बरा झाल्याचे अपडेट शेअर केले होते. कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर किरण खेर 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

त्याच वेळी, गेल्या वर्षी एका मुलाखतीदरम्यान अनुपम खेर यांनी किरणच्या निदानाबद्दल सांगितले आणि त्यांची रिकव्हरी हा सर्वात मोठा विजय असल्याचे सांगितले होते. "मानवी आत्मा हा सगळ्यात मजबूत आहे. लेट गो करणे हा पर्याय नाही. कारण तुम्हाला माहित आहे यामुळे तुम्ही लोकांसाठी आदर्श बनता." असे अनुपम खेर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

किरण प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची पत्नी आहे. दोघांनी 1985 मध्ये लग्न केले. त्याआधी किरण यांचे बिसनेसमॅन गौतम बेरी यांच्याशी लग्न झाले होते.

किरण यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी 'आई'ची भूमिका साकारली आहे. देवदास, रंग दे बसंती, हम तुम, दोस्ताना, मैं हूं ना हि त्यांच्या चित्रपटांची नावे आहेत.

अनुपम लवकरच विवेक अग्निहोत्री यांच्या 'द वॅक्सीन वॉर' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय इमर्जन्सीमध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. याचे दिग्दर्शनही ती स्वत: करत आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT