Jaya Bachchan Angry In Rajya Sabha Speaker Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan Angry : अमिताभ बच्चन यांचं नाव घेताच जया बच्चन राज्यसभा स्पीकरवर भडकल्या, नेमकं काय घडलं ? पाहा Video

Jaya Bachchan Angry In Rajya Sabha Speaker : जया बच्चन यांनी काल राज्यसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी भाषण करण्यापूर्वी स्पीकरने त्यांचं नाव 'जया अमिताभ बच्चन' असं नाव घेतल्यामुळे त्या भडकल्या आहेत.

Chetan Bodke

अभिनेत्री जया बच्चन ९० च्या दशकातील बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. जया बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेतच शिवाय खासदार देखील आहेत. समाजवादी पार्टीच्या सदस्य असलेल्या जया बच्चन ह्या राज्यसभेत खासदार आहेत. नुकतंच जया बच्चन यांनी राज्यसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी भाषण करण्यापूर्वी स्पीकरने त्यांचं नाव 'जया अमिताभ बच्चन' असं नाव घेतल्यामुळे त्या भडकल्या आहेत.

सोमवारी (२९ जुलै) राज्यसभेत दिल्लीतील कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या घटनेची चर्चा सुरू होती. यावेळी अनेक राज्यसभा सदस्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांनी चर्चेत सहभागी होण्यासाठी खासदार जया बच्चन यांचं नाव 'जया अमिताभ बच्चन' असं पुकारलं. त्यामुळे जया बच्चन भडकल्या आहेत. यावेळी राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, "उपसाभापती महोदय, तुम्ही माझं नाव फक्त 'जया बच्चन' असं घेतलं असतं तर बरं झालं असतं."

जया बच्चन यांच्या ह्या उत्तरावर उपसभापती म्हणाले की, "इथे तुमचं जसं नाव लिहिलं आहे, तसंच मी पुकारलं आहे. " त्यावर जया यांनी नाराजी दर्शवली आहे. त्या म्हणाल्या की, " ही जी काही नवीन पद्धत समोर आली आहे, त्यामुळे महिलेची ओळख ही तिच्या नावाने नाही तर तिच्या पतीच्या नावाने होतेय. त्यामुळे महिलेचं काही अस्तित्वच उरत नाही. हे चुकीचं आहे." जया यांच्या ह्या विधानावर उपसभापतींनी "तुमचं खूप मोठं अस्तित्व आहे..." असं उत्तर दिलं.

पण शेवटी हा वाद जास्त न वाढता जया बच्चन शांत झाल्या आणि त्यांनी दिल्लीतील कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या घटनेच्या चर्चेला सुरुवात केली. भाषणामध्ये जया विद्यार्थांची बाजू मांडत असताना भावुक झाल्या. सध्या जया बच्चन यांचं राज्यसभेतलं हे भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून भाषणाचं कौतुक केलं जात असून जया बच्चन यांनी मांडलेल्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. अशा अनेक युजर्सने कमेंट केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT