Poonam Pandey Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey Video: पूनम पांडेने सलग दुसरा व्हिडीओ केला शेअर, निधनाची पोस्ट टाकल्याचं सांगितलं कारण

Poonam Pandey News: मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने सोशल मीडियावर निधनाची खोटी बातमी का दिली, याबद्दलचा व्हिडीओ तिने स्वत: शेअर केला आहे.

Chetan Bodke

Poonam Pandey Video

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कर्करोगाने (Survical Cancer) निधन झाल्याच्या बातमीने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. पण अभिनेत्रीने स्वत: व्हिडीओ शेअर करत तिने निधनाची पोस्ट का शेअर केली, यामागील कारण सांगितलं आहे.

"तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे. - मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे." असं म्हणत अभिनेत्रीने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, "हो मी माझी माझ्या मृत्यूची बातमी खोटी दिली, हो हे अतिशय चुकीचे आहे, पण माझ्या मृत्यूची बातमी ऐकताच अचानक सर्वजण अचानक गर्भाशयाच्या कॅन्सरवर बोलू लागले आणि हे होणं गरजेचं होतं. मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे." सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड संतापले असून तिच्यावर टीका टीप्पणी करताना दिसत आहे.

दरम्यान, पूनम पांडेचं निधन झालं अशी माहिती तिच्या सोशल मीडिया मॅनेजरने दिली होती. या दरम्यान, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. पूनमच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड जगतात मोठं वादळ उठलं होतं. अनेकांनी भावनिक पोस्ट करत पूनम पांडेला श्रद्धांजली देखील वाहिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT