Ananya Soni
Ananya Soni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Kidney Fail: अभिनेत्रीवर अत्यंत वाईट वेळ, दोन्ही किडन्या फेल.. आता उपचारासाठी पैसेही नाहीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सिनेसृष्टीतील झगमगात प्रत्येकालाच आकर्षित करतो. पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांचं अलिशान जगणं प्रत्येकाला हवंहवसं वाटतं. मात्र हसतमुख दिसणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा पडद्यामागचा संघर्ष आपल्याला दिसत नसतो.

अशीच एक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्रीची किडनी खराब झाली असून आता तिला उपचारासाठी पैशांची कमतरता भासू लागली आहे.

अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. 'इश्क में मरजावा' मालिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री अनाया सोनीवर ही परिस्थिती ओढावली आहे. अनयाची तब्येत इतकी बिघडली आहे की आता डॉक्टरांनी तिला डायलिसिसवर ठेवण्यास सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनाया सोनीची एक किडनी पूर्णपणे खराब झाली आहे. अनयाची प्रकृती याआधीही खालावली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी त्यांची किडनी दान केली होती. मात्र आता दुसरी किडनीही खराब झाली आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीकडे किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही.

अनाया सोनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. अनायाने या पोस्टमध्ये लिहिले की, 'डॉक्टरांनी सांगितले की माझी किडनी निकामी झाली आहे. मला डायलिसिसवर जावे लागणार आहे. माझी क्रिएटिन पातळी 15.67 आहे आणि हिमोग्लोबिन 6.7 आहे. माझी प्रकृती गंभीर असून मला सोमवारी अंधेरी पूर्व येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करा. आयुष्य माझ्यासाठी सोपे नाही मात्र मी ते सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे. ही वेळही निघून जाईल. लवकरच माझे किडनी प्रत्यारोपण होणार आहे.'

अनाया अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. 'मेरे साई', 'इश्क में मरजावां', 'है अपना दिल तो आवारा' आणि 'अदालत' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

Pankaja Munde: 'मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्या', बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी; VIDEO

SCROLL FOR NEXT