Ananya Panday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ananya Panday : ब्रेकअपच्या चर्चांना उधाण; अनन्या पांडे म्हणाली, मी खूप लकी...

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने तिच्या क्रशबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ती अभिनेता हृतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday) लवकरच साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या(Vijay Deverakonda) 'लिगर' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. याशिवाय ती लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'द समर आय टर्न्ड प्रिटी' शोचे भारतात प्रमोशन करताना दिसणार आहे. या सगळ्याशिवाय अनन्या सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. माहितीनुसार, अभिनेता इशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत अनेकदा दिसली होती.

अनन्याने तिच्या 'द समर आय टर्न्ड प्रिटी' शो आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल एका मुलाखतीत सांगितले. अनन्याने एका वृत्तपात्रासाठी मुलाखत देताना खुलासा केला की, 'ती आगामी शो 'द समर आय टर्न्ड प्रिटी'बद्दल खूप उत्सुक आहे. अॅमेझॉन प्राइमचे आभार मानताना तिने सांगितले की, 'मी खूप भाग्यवान आहे की, मला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या शोच्या प्रमोशनसाठी आमंत्रित करण्यात आले'.

मुलाखती दरम्यान तुझी सपोर्ट सिस्टम कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अनन्या म्हणाली, 'माझ्या आयुष्यात बरेच लोक मला प्रोत्साहन देत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी आई (भावना पांडे). कारण तिच्याशी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणे खूप सोपे आहे. ती अनेक गोष्टींबाबतीत मला खूप शांतपणे आणि योग्य सल्ला देते'.

ती पुढे म्हणाली की 'मी माझ्या आयुष्यात अनेक चुकीच्या गोष्टी करते, पण माझी आई नेहमी माझ्या चुका सुधारते. तिला माहिती असतं की मला कोणापासून लांब राहिलं पाहिजे'. अनन्याने आपल्या यशाबद्दल तिच्या मैत्रीणींनाही श्रेय दिले. 'मला जगातील सर्वोत्तम मैत्रिणी भेटल्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे, टचवुड, माझ्याकडे खूप मजबूत सपोर्ट सिस्टम आहे', असे अनन्या तिच्या मैत्रिणींचे कौतुक करत म्हणाली.

अनन्याने तिच्या बालपणीच्या क्रशबद्दलही खुलासा केला आणि तो दुसरा कोणी नसून अभिनेता हृतिक रोशन आहे. 'मी हृतिक रोशनबद्दल खूप पझेसिव्ह होते. मला वाटतं 'कहो ना प्यार है' रिलीज झाला तेव्हा मी २ किंवा ३ वर्षांची होते. चित्रपट पाहिल्यानंतर, मी त्याला एका पार्टीत पाहिलं होतं. पार्टीत मी 'हृतिक... हृतिक' म्हणून जोरात ओरडायला लागले. तेव्हा माझ्या पालकांनी 'ही आमची मुलगी नाही' असे सगळ्यांना सांगितलं होतं. मी हृतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे'. हा मजेदार किस्साही अनन्याने या मुलाखतीत सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT