Sonam Wangchuk Hunger Strike Saam tv
मनोरंजन बातम्या

'मंत्रिपद सोडायचं नसेल तर...', सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला मराठमोळ्या कलाकारांचा पाठिंबा; केंद्र सरकारला दिला 'हा' सल्ला

Sonam Wangchuk Hunger Strike : अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थन जाहीर केले आहे. सरकारने संवाद साधावा आणि नागरिकांनीही शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Shruti Vilas Kadam

Sonam Wangchuk Hunger Strike : जंतर मंतरवर सुरु असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. आता अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही त्यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारला तातडीने संवाद सुरू करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनाही शांततापूर्ण पद्धतीने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्येष्ट अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ व्या दिवस आहे. 'नीट' (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना समर्थन दर्शवले आहे.

अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले की, नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. १६ तारखेला मी माझ्या घरी राहून एक दिवसाचे उपोषण करणार आहे. या उपोषणामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, सोनम-जी आणि त्यांचे सहकारी ज्या वेदना सहन करत आहेत, त्याबद्दल मला सहानुभूती व्यक्त करायची आहे. दुसरे म्हणजे, सरकारने आपली संवेदनशीलता दर्शवावी, असे आवाहन मला करायचे आहे. सोनम-जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते त्यांच्या मागण्यांमागे अत्यंत गंभीर कारणे आहेत; याउलट, ती कारणे अयोग्य आणि मागण्या अनाठायी असल्याचे सरकारला वाटते. आपले सरकार असंवेदनशील आहे, हे मी अजिबात मान्य करायला तयार नाही; कारण अनेकदा आपण सरकारला भावना व्यक्त करताना आणि लोकांच्या वेदनांशी एकरूप होताना पाहिले आहे. मात्र, या प्रकरणात कदाचित काही गैरसमजांमुळे ती संवेदनशीलता दिसून येत नसावी. यात संवादाचा अभाव आहे. त्यामुळे, सरकारने त्वरित संवाद सुरू करावा, अशी मी विनंती करतो."

त्याचबरोबर अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या आंदोलनावर आपल्या प्रतिक्रिया देत म्हटले, तुम्हाला मंत्रीपद सोडायचे नसेल तर नका सोडू. पण, सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडवा.  सिनेमातील रँचोला एवढा जीव लावला. मग खऱ्या रँचोसाठी सगळी लोक आवाज का उठवत नाहीत. सोनम वांगचुक यांच्यासारखी माणसं देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. मी तर विनंती करतो आहेच. पण, समजुतदार व्यक्तीनं सोनम वांगचुक यांच्यासाठी पुढं यावं. सरकारने ताबडतोब मध्यस्थी करावी. यासह त्यांना हा व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, शांततेच्या मार्गानेही क्रांती घडवता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
उपोषण ही कमकुवतपणाची नव्हे, तर आपल्या भूमिकेवरील दृढ विश्वासाची भाषा आहे.
जे स्वतःसाठी नाही, तर निसर्गासाठी, हिमालयासाठी आणि भावी पिढ्यांसाठी उपोषण करतात, त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy morning habits: चांगल्या आरोग्यासाठी सकाळच्या या ६ सवयी वेळीच बदला!

पावसाळ्यात रोज आवळा ज्यूस प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update : पुण्यात फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या दिवशी हॉटेल, क्लब रात्री २.३० पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

Pune Crime: पुण्यात कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या, व्हिडीओ शूट करत संपवलं आयुष्य

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात मोठी दुर्घटना, रोहिंग्या निर्वासितांच्या बोटी उलटल्या, ५०० हून अधिक जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT