Chiyaan Vikram Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ponniyin Selvan-1 : टीझर रीलीज होण्यापूर्वीच सुपरस्टार विक्रमची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केले दाखल

अभिनेता विक्रम 'पोनियिन सेल्वन-१' टीझर लॉन्चसाठी उपस्थित राहू शकणार नाही. काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साउथचा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम (Chiyaan Vikram) हा त्याचा आगामी चित्रपट 'पोनियिन सेल्वन-१' (Ponniyin Selvan-1) च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे. आज या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे. परंतु या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी अभिनेता विक्रम उपस्थित राहू शकणार नाही. माहितीनुसार, काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विक्रमची तब्येत कशामुळे बिघडली आणि त्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले याचे कारण सध्या तरी कळू शकले नाही. मात्र आज तो पोनियिन सेल्वनच्या टीझर लॉन्चसाठी जाणार होता. परंतु त्याआधीच त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. माहितीनुसार, विक्रमला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याची एंजियोप्लास्टी करण्यात आली असून, अजून तरी त्याच्या प्रकृतीबदल कोणत्याही अपडेट समोर आल्या नाहीत.

विक्रम आज संध्याकाळी त्याच्या आगामी 'पोनियिन सेल्वन-1' या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी उपस्थित राहणार होता. हा टीझर आज संध्याकाळी ६ वाजता एका रीलीज होणार आहे. हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला असून, या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, जयम रवी, सरथ कुमार आणि त्रिशा हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

विक्रमचा आगामी चित्रपट 'कोब्रा' ११ ऑगस्ट रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन अजय ज्ञानमुथूने केले आहे. या चित्रपटामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण त्याचबरोबर श्रीनिधी शेट्टी, मिरनालिनी रवी, के.एस रविकुमार आणि मिया जॉर्ज हे कलाकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नर्तिकीच्या नादात माजी उपसरपंचाने गोळी झाडून आयुष्य संपवलं, मेहुण्याने जे सांगितलं ते वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: मुरुम उत्खनन प्रकरणात अजित पवारांची कोंडी? मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

Maharashtra Weather : राज्यात पावसाच्या दोन तऱ्हा, कुठे ऊन तर कुठे पाऊस? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Kunbi Maratha : सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

iPhone 17 सीरीज लाँच; भारतात किंमत किती? फिचर्स आणि कॅमेराबद्दल सर्वकाही जाणून घ्या

SCROLL FOR NEXT