Tiger Shroff Firing SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Tiger Shroff Firing Case News : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा! हल्ला प्रकरणात दोन ग्रुपचा सहभाग असून याचा म्होरक्या अनिल पंडित असल्याचा दावा.

Alisha Khedekar

  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन वेगवेगळे ग्रुप

  • सहा आरोपींवर शस्त्रांची व्यवस्था करून ती शूटरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी

  • पोलिसांची न्यायालयाला महत्व्वाची माहिती

साक्षी यादव, मुंबई

अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचे दोन वेगवेगळे ग्रुप काम करत होते. एका ग्रुपकडे गोळीबार करण्याची जबाबदारी होती, तर दुसरा ग्रुप शस्त्रांची व्यवस्था करणे, ती शूटरपर्यंत पोहोचवणे आणि इतर आवश्यक मदत पुरवण्याचे काम करत होता, असा खुलासा पोलिसांनी न्यायालयात केला.

विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सहा आरोपी शस्त्रे मिळवून ती गोळीबार करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत होते. तर उर्वरित आरोपी मुंबईतील विविध ठिकाणी रेकी करून गोळीबाराच्या कटासाठी मदत करत होते. या संपूर्ण टोळीचे नेतृत्व अनिल पंडित करत असल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयात केला आहे.

तपासादरम्यान आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी डिजिटल ॲपचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन तपासले असता त्यामध्ये व्हॉट्सॲप चॅट, व्हॉइस नोट्स आणि व्हिडिओ क्लिप्स मिळाल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे कटातील प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गुन्ह्यासाठी लागणारा पैसा कुठून उपलब्ध झाला, आर्थिक व्यवहार कोणी केले आणि आणखी कोणाचा या प्रकरणात सहभाग आहे, याचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही आरोपींनी तपासादरम्यान बनावट आधार कार्ड सादर केले असावेत, असाही पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, विशेष मकोका न्यायालयाने या प्रकरणातील सर्व ११ आरोपींना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच हरियाणातील सोनीपतमधून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना पैसे मिळवून देण्यासाठी त्याने बँक खात्याचा तपशील पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसरीकडे, या गोळीबारात जखमी झालेले उमेश चौहान यांना ११ दिवसांच्या उपचारानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंडिया आघाडीच्या मॉक पार्लमेंटला भाजपही मॉक पार्लमेंटने देणार उत्तर

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, १८ ट्रेनचे तिकीटदर होणार कमी; आता स्वस्तात करा प्रवास

Zumba vs Walking: झुंबा की वॉकिंग? वजन कमी करण्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर?

SIR Update : महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये SIR प्रक्रियेला मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शेवटची तारीख काय?

ZP Election: झेडपी निवडणुकांचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'या' जिल्हा परिषदांमध्ये होणार निवडणूक; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT